मायबाप सरकार... आमच्याकडेही लक्ष द्या 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 नोव्हेंबर 2019

राज्यावर पाच लाख कोटींचे कर्ज आहे. नव्या सरकारच्या नूतन कर्जमाफीने राज्याच्या तिजोरीवर 55 हजार कोटींचा भार पडणार, हे निश्‍चित आहे. म्हणून सरकारने कर्जमाफीचा तोच तो कित्ता न गिरविता, पिकांना रास्त हमीभाव, स्वामिनाथन आयोगाच्या सर्व शिफारशी राज्याअंतर्गत लागू कराव्यात. 

यवतमाळ : राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात युती सरकारने पाच वर्षे सरकार चालवली. देवेंद्र फडणवीस हे भाजपचे पहिले नेते ठरले ज्यांनी पूर्ण काळ सत्ता चालवली. या काळात युती सरकारने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. शेतकऱ्यांना सहा हजार रुपये पेन्शन, नुकसानभरपाई, रोजगार आदी निर्णयांचा समावेश आहे. मात्र, या सरकारने शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याचा अरोप झाला. नेहमी शेतकऱ्यांना गाजर दाखवल्याची ओरड सर्वच स्तरावरून झाली. 

यवतमाळ जिल्हा शेतकरी आत्महत्येसाठी प्रसिद्ध आहे. विदर्भात सर्वाधिक आत्महत्या येथेच झाल्या आहेत. त्यामुळे नवीन सरकारकडून सर्वाधिक अपेक्षा याच जिल्ह्यातील नागरिकांना असते. नवीन सरकार येईल आणि आपल्यासाठी आनंदाची बातमी घेऊन येईल अशी चर्चा जिल्हावासीयांना असते. जवळजवळ दोन महिन्यांच्या काळ लोटल्यानंतर राज्यात महाशिवआघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असून, कार्यकाळाला सुरुवात झाली आहे. 

Image may contain: plant, nature and outdoor
शेतात पडलेला कापूस 

यामुळे नवीन सरकारकडून नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. शेतमालाला हमीभावासह कर्जमाफी मिळावी, रोजगारनिर्मिती व्हावी, महागाई कमी करावी, शिक्षणासह विविध विभागातील सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, शिक्षण, आरोग्य, रस्ते, वीज आदी मूलभूत सुविधा सर्वांपर्यंत सुलभपणे पोहोचाव्यात यासाठी राज्यात सत्तेवर आलेल्या महाविकासआघाडी सरकारने आवश्‍यक त्या उपाययोजना कराव्यात, अशा अपेक्षा शहरासह जिल्ह्यातून व्यक्त होत आहेत. शेतकरी, गृहिणी, व्यावसायिक, शिक्षक, सुशिक्षित बेरोजगारांसह सरकारी कर्मचारी यांनी नव्या सरकारकडून खूप अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. नागरिकांनी व्यक्‍त केलेल्या प्रतिक्रिया खालीलप्रमाणे... 

विदर्भात दोन शेतकऱ्यांनी संपविले जीवन 

Image may contain: plant, tree, grass, sky, outdoor and nature
सोयाबीनचे झालेले नुकसान 

पाण्याची टंचाई दूर करा

प्रकल्पासाठी ज्यांनी शेतजमिनी व घरदारे दिली त्या प्रकल्पग्रस्तांना व प्रकल्पाच्या परिसरातील महिलांना भरउन्हात पाण्यासाठी कसरत करावी लागते. पुनर्वसित गावांत पाणीटंचाईची समस्या बिकट झाली आहे. कधी जलवाहिनी फुटते, कधी हातपंप बंद पडल्यानंतर दोन-दोन महिने दुरुस्तीसाठी लागतात. महिलांना पाण्यासाठी कोसोदूर पायपीट करावी लागते. मुक्‍या जनावरांचीही पाण्याअभावी गैरसोय होते. टंचाई दूर होण्यासाठी आवश्‍यक ते नियोजन नवीन सरकारकडून होण्याची गरज असल्याचे मत बेंबळा प्रकल्पग्रस्त, कोल्ही येथील लक्ष्मीबाई वानखडे म्हणाले. 

Image may contain: plant, grass, outdoor and nature

शिक्षकांच्या समस्या निकाली काढा

शिक्षकांच्या समस्या निकाली काढण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा. विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांचे वेतन, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन हे प्रश्‍न सोडवायला हवेत. सरकारी शिक्षण ग्रामविकास व शहरी विकास विभागाच्या कचाट्यातून काढून त्यावर फक्त शिक्षण विभागाचे नियंत्रण असायला हवे. ऑनलाइन बदल्यांच्या धोरणात बदल्यांना मर्यादा घालणे आवश्‍यक आहेत. कोणत्याच शाळेला शिक्षकांची उणीव भासणार नाही, याची दक्षता नवीन सरकारने घ्यावयास हवी. मुलींचा उपस्थिती भत्ता गेली 25 वर्षांपासून दरदिवसाला फक्त एक रुपया असून, त्यात भरीव वाढ करावी. सरकारी शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या शंभर टक्के विद्यार्थ्यांना गणवेश उपलब्ध करून द्यावा. शाळांचे वीजबिल माफ करावे, पोषण आहार अधिक दर्जेदार करावा, दप्तराचे ओझे या बाबींवरही लक्ष द्यायला हवे, असे मत दिग्रस येथील शिक्षक आमीन चौहान यांनी व्यक्‍त केले. 

Image may contain: sky, outdoor and nature
कापसावर रोटाव्हेटर फिरविताना शेतकरी 

विश्वास बसेल का? खाड्यांमुळे झाली प्रसूती! 

शेतमालाला हमीभाव द्या 
नापिकी, अतिवृष्टीमुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या वेदनेत भरच पडली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफीसह शेतमालाला हमीभाव द्यावा. 
- अनुप चव्हाण, 
शेतकरी, बोथबोडण

व्यापाऱ्यांना दिलासा मिळावा 
गेल्या पाच वर्षांत व्यापाऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले आहे. आता महाविकास आघाडीचे सरकार आल्याने व्यापाऱ्यांना दिलासा मिळावा, अशी अपेक्षा आहे. 
- ज्ञानेश्‍वर अंगाईतकर, 
व्यावसायिक, यवतमाळ

राज्यातील पहिले "स्मार्ट पोलिस ठाणे' कुठे आहे रे भौ?

नवीन सरकारने दिलासा द्यावा 
सरकार कुणाचेही आल्यास महागाई कमी होत नाही. हा आम्हा महिलांचा आजवरचा अनुभव आहे. वाढत्या महामार्गमुळे घराचे आर्थिक बजेट कसे सांभाळावे, हा प्रश्‍न चिंतेचा आहे. नवीन राज्य सरकारने दिलासा द्यावा. 
- पुष्पा लोखंडकर, 
गृहिणी, यवतमाळ

नुकसानभरपाई मिळाली पाहिजे 
शिक्षकांची जुनी पेन्शन योजना लागू करावी, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली पाहिजे. जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा या दिल्ली येथील शाळासारख्या झाल्या पाहिजेत. 
- रेखा प्रल्हाद पोयाम, 
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भारी

आवाज कुणाचा... महाविकास आघाडीचा!

झिरो फाईल पेन्डसी राबवा 
राज्यात कार्यरत कर्मचारी, शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. अधिकारी व शिक्षकांची पदभरती करण्यात यावी. अनुशेष दूर करण्यात यावा. झिरो फाईल पेन्डसी राबविण्यात यावी. 
- दिवाकर राऊत, 
विदर्भप्रमुख तथा जिल्हाध्यक्ष, इब्टा शिक्षक संघटना

हाताला काम द्या 
बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे. गेल्या सरकारकडून रोजगार देण्याच्या नावावर केवळ आश्‍वासने देण्यात आली. त्यामुळे नवीन सरकारने तरी बेरोजगारांच्या हाताला काम मिळवून द्यावे व शेतकऱ्यांना नुकसानभरपाईसुद्धा द्यावी. 
- सुनील ढाले, 
सुशिक्षित बेरोजगार, यवतमाळ

दीक्षाभूवरील अनुयायांची 'शिदोरी' बनलेला नेता दुसऱ्यांदा मंत्री 

बेरोजगारांच्या विचार झाला पाहिजे 
शेतकऱ्यांसोबत सुशिक्षित बेरोजगारांच्या विचार झाला पाहिजे. नवीन सरकारकडून सुशिक्षित बेरोजगारांच्या खूप अपेक्षा आहेत. सर्वांत पाहिले त्यांनी शेतकऱ्यांचे कर्जमाफ करायला पाहिजे. याबरोबरच आज मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. त्यामुळे बेरोजगारांच्या हाताला काम मिळाले पाहिजे. 
- विशाल भोयर, 
सुशिक्षित बेरोजगार

वेळेत पीककर्ज उपलब्ध व्हावे 
शेतमालास योग्य भाव, सहकार क्षेत्रात मागील सरकारच्या काळात झालेली पडझड भरून काढीत हे क्षेत्र मजबूत करावे. बंद सूतगिरण्या, साखर कारखाने सुरू कराव्यात, शेतमाल विक्रीसाठी बाजार समिती सक्षम कराव्यात, सोबत कर्जमाफी व वेळेत पीककर्ज उपलब्ध व्हावे. 
- सुभाष राठोड, 
शेतकरी बोदेगाव

मदत देण्यास हात आखडता का?

नोकरी द्या 
नवीन सरकारने गोरगरीब जनता व शेतकऱ्यांना न्याय द्यावा. नवयुवकांना रोजगार देऊन बेरोजगारी दूर करावी. याशिवाय कर्मचाऱ्यांबाबतही चांगली धोरणे स्वीकारावीत. शिक्षित युवकांना लवकरात लवकर सरकारी यंत्रणेत नोकरी देण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे. 
- ऍड. अमोल चिरडे, 
माजी सचिव, तालुका वकील संघ, दारव्हा

मराठी शाळांना तत्काळ शंभर टक्के अनुदान द्या 
नवीन सरकारने शिक्षण व्यवस्थेला चालना देण्यासाठी विनाअनुदानित मराठी शाळांना तत्काळ शंभर टक्के अनुदान द्यावे. पेन्शन योजना 2005 नंतरच्या नियुक्त कर्मचाऱ्यांनाही लागू करावी, वेतनेतर अनुदान खासगी शाळांना नियमितपणे दिले पाहिजे. ज्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळेल. 
- भैरव भेंडे, 
मुख्याध्यापक, इंदिराबाई पाटील विद्यालय, सायखेडा 

आंबेकरने सीएकडून उकळली २५ लाखांची खंडणी 

विकासाचे धोरण ठरवावे 
सरकारने शेतकरी, बेरोजगारीला केंद्रबिंदू माणून त्यांच्या विकासाच्यादृष्टीने पावले उचलावीत. शेतमालाला योग्यभाव मिळावा, निव्वळ कर्जमाफी हा उपाय नसून, एकंदरीत शेतकरी विकासासंदर्भात शेतकरीविरोधी धोरण कालबाह्य करू विकासाचे धोरण ठरवून सरकारने ते अंमलात आणावे. 
- गणेश झाडे, 
प्रगतिशील शेतकरी, नेर

कृषिपंपांना 24 तास वीजपुरवठा द्या 
सरकारने संपूर्ण कर्जमाफ करून शेतमालास योग्यभाव देण्याचा निर्णय घ्यावा. अवकाळीतील नुकसानभरपाई त्वरित मिळावी. कृषिपंपांना 24 तास वीजपुरवठा मिळावा, बिगरशेती कामगारांना वृद्धापकाळ वेतन देण्यात यावे, शेती व्यवसायातून नफा मिळेल, असे धोरण राबवावे. 
- गोविंदा नीलकंठ निखाडे, 
शेतकरी, वेगाव

नागपूर शहराच्या विकासाला खीळ बसण्याची भीती 

शासकीय सेवेत संधी उपलब्ध करून द्या 
पोर्टल बंद करून पर्यायी व्यवस्थापनाकडून पारदर्शक पद्धतीने सर्व शासकीय यंत्रणेतील रिक्त पदांची तत्काळ भरती करावी. तालुकास्तरावर शासकीय वाचनालयाची उभारणी करावी. स्पर्धा परीक्षा पूर्वतयारीसाठी महाविद्यालयस्तरावर मार्गदर्शन करणे अनिवार्य करावे, विदर्भातील बेरोजगारांना शासकीय सेवेत संधी उपलब्ध करावी. 
- मोहन श्रीराम पायघन, 
सुशिक्षित बेरोजगार, केगाव

संपूर्ण कर्जमाफी मिळावी 
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी, गरजू शेतकरी कुंटुबांतील विद्यार्थ्यांना शिक्षणात विविध सवलती नव्या सरकारने द्याव्यात, अशा अपेक्षा आहेत. 
- विनायक राठोड, 
विद्यार्थी, रा. विठोली

नुकसान १५ हजार हेक्टरचे, पाहणी दोन शेतांची

कर्जमाफीचा कित्ता गिरवू नये 
हल्ली राज्यावर पाच लाख कोटींचे कर्ज आहे. नव्या सरकारच्या नूतन कर्जमाफीने राज्याच्या तिजोरीवर 55 हजार कोटींचा भार पडणार, हे निश्‍चित आहे. म्हणून सरकारने कर्जमाफीचा तोच तो कित्ता न गिरविता, पिकांना रास्त हमीभाव, स्वामिनाथन आयोगाच्या सर्व शिफारशी राज्याअंतर्गत लागू कराव्यात. 
- जय राठोड, 
सुशिक्षित तरुण, दिग्रस

प्रगत महाराष्ट्र घडवा 
शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्यभाव मिळावा, शेतकऱ्यांचे कर्जमाफ करावे, सध्या महाराष्ट्रात असलेली परिस्थिती सुधारून प्रगत महाराष्ट्र घडवावा. 
- वैष्णवी तुपोने, 
तरुणी, दिग्रस

शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी प्रयत्न करा 
सुशिक्षित बेरोजगारांसाठी रोजगारनिर्मिती करावी, महाराष्ट्रातील अनेक भागांत असलेल्या पाणीटंचाईवर उपाय शोधून ती दूर करावी व शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी प्रयत्न करावेत. 
- ऋग्वेद सारफळे, 
तरुण, दिग्रस

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Citizens expect from the new government