दिवसाआड पाणीपुरवठ्याबाबत नागरिक अनभिज्ञ

file photo
file photo

नागपूर : दिवसाआड पाणीपुरवठा सुरू असल्याबाबत अनेक नागरिक अनभिज्ञ असल्याचे वेगवेगळ्या भागातून आलेल्या तक्रारीतून स्पष्ट झाले. बुधवार व शुक्रवारी शहरात पाणीपुरवठा बंद होता. या दोन दिवसांत पाण्यासंदर्भात तीनशेवर तक्रारी आल्याचे मनपातील सूत्राने नमूद केले.
महापालिकेने सोमवारी एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय जाहीर केला. बुधवारपासून शहरात दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. बुधवारी पहिल्याच दिवशी नागरिकांची तारांबळ उडाली. पहिल्या दिवशी महापालिकेला पाण्याबाबत 203 तक्रारी मिळाल्या. या तक्रारीमध्ये अनेकांनी दिवसाआड पाणीपुरवठ्याबाबत माहितीच पोहोचली नसल्याचे सांगितले. अनेकांनी यासाठी शहराबाहेर असल्याची कारणे दिली तर शहर सीमेवरील काहींनी वृत्तपत्रच पोहोचत नसल्याने माहिती नसल्याचे कारण पुढे केले. शुक्रवारीही पाणी बंद असल्याने शंभरावर तक्रारी आल्याचे जलप्रदाय समिती सभापती पिंटू झलके यांनी सांगितले. शहरात शुक्रवारी पाणीबंद असल्याने अनेकांची तारांबळ उडाली.
शहरातील आशीनगर, नेहरूनगर, सतरंजीपुरा व लकडगंज झोनमध्ये कन्हान नदीतून पाणीपुरवठा केला जातो. कन्हान नदीतून पाणीपुरवठा बंद केल्यास पाणी वाहून जाईल. त्याऐवजी कन्हान नदीतून या चार झोनचा पाणीपुरवठा सुरळीत असल्याने येथील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. कन्हानमधून बुधवारी 190 तर शुक्रवारी 188 एमएलडी पाणी सोडण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com