साडेतीन हजारांवर जीर्ण घरांतील नागरिक धोक्‍यात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

नागपूर : शहरात साडेतीन हजारांवर जीर्ण घरे आहेत. या घरांवर कारवाईबाबत महापालिका उदासीन असल्याने यातील नागरिकांचा जीव धोक्‍यात आला आहे. महापालिका केवळ नोटीस बजावून औपचारिकता पूर्ण करीत आहे. विशेष म्हणजे, जीर्ण घरांवर कारवाई करण्यास पुढाकार घेतल्यानंतर राजकीय दबाव येत असल्याची खंत अधिकारी व्यक्त करीत असल्याने एखादा मोठा अपघात झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

शहरातील गंगाजमुना भागात मंगळवारी एका घराची भिंत पडून चार महिला जखमी झाल्या. यातील 25 वर्षीय सुमित्रा गुद्दावत यांचे निधन झाल्याने शहरातील जीर्ण घरांचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला. शहरातील इतवारी, महाल, जुनी मंगळवारी, गरोबा मैदान, बगडगंज, गांधीबाग हा सर्वांत जुना भाग आहे. या भागात अनेक घरे जीर्ण आहेत. पावसाळ्यात या जीर्ण घरमालकांना नोटीस देऊन सतर्कतेचा इशारा दिला जातो. पडण्याच्या स्थितीतील घरातील नागरिकांना घर पाडण्यासंदर्भात नोटीस दिली जाते. शहरात मोठमोठ्या इमारतींचे बांधकाम होत असले, तरी गरीब कुटुंबांची जुनी घरे अजूनही कायम आहेत. ही घरे जीर्ण झाली आहेत. परंतु, नवीन बांधकाम करण्याची कुवत नसलेले हजारो नागरिक येथेच वास्तव्य करीत आहेत. साडेतीन हजार जीर्ण घरे असल्याचे सूत्राने सांगितले. अनेकदा नोटीस बजावून कारवाईसाठी पुढाकार घेण्यात येतो; परंतु राजकीय दबावामुळे माघार घ्यावी लागत असल्याचे एका अधिकाऱ्याने नमूद केले. तसेच भाडेकरूंकडून घर रिकामे करून देण्यासाठी अशा घरांवर कारवाई केली जात असल्याचेही चित्र आहे. त्यामुळे राजकीय दबावाने माघार घेणारे अधिकारी तसेच घरे खाली करून देण्याची सुपारी घेणारे अधिकारी, यामुळे जीर्ण घरांचा प्रश्‍न वर्षानुवर्षे कायम आहे.
गांधीगेटजवळ कारवाई
मंगळवारी रात्री झालेल्या घटनेनंतर महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागाने जीर्ण घरांवर कारवाईस आज सुरुवात केली. गांधीगेटजवळील सचिन शिवणकर यांचे जीर्ण घर पाडण्यात आले. यापूर्वी घराची भिंत शेजारी राहणारे गोपाळ साळुंखे यांच्या घरावर पडली होती. त्यानंतर शिवणकर यांना घर पाडण्यासंदर्भात नोटीस बजावण्यात आली होती. परंतु, त्यांनी दुर्लक्ष केल्याने आज कारवाई करण्यात आली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Citizens in old homes are at risk for three and a half thousand