खासगी वाहनांवरच नागरिकांचा भरवसा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

खासगी वाहनांवरच नागरिकांचा भरवसा
नागपूर : अल्प प्रतिसादामुळे ग्रीन बसला अखेरची घरघर लागली असून सध्या बंद करण्यात आली आहे. आता माफक भाडे असूनही इतर लाल रंगाच्या बसलाही नागपूरकर प्रतिसाद देत नसल्याने 36 शहर बस बंद करण्यात आल्या. त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीबाबत नागपूरकर अद्यापही गंभीर नसून खासगी वाहनांवरच त्यांचा भरवसा असल्याचेच अधोरेखित झाले.

शहरात मोठ्या गाजावाजासह सुरू करण्यात आलेली ग्रीन बस बंद करण्यात आली आहे. नागरिकांचा प्रतिसाद मिळत नसल्याने या बस बंद करण्यात आल्या. मात्र, नागपूरकरांच्या सुविधेसाठी शहराच्या काही भागातून थेट लांब मार्गाच्या लाल बस सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र, या सुविधांकडेही नागपूरकरांनी पाठ फिरविल्याने विविध मार्गांवरील 36 बंद करण्यात आल्या. यात पंचशील चौक ते जयताळा चौक, बर्डी ते मिरे ले-आउट, गांधीबाग ते काटोल नाका, गांधीबाग ते काटोल नाका, महाराजबाग ते गोरेवाडा-दाभा, महाराजबाग-बोरखेडी, हिंगणा ते बुटीबोरी एमआयडीसी या मार्गावरील बसचा समावेश आहे. महापालिकेने या मार्गावर कायमस्वरूपी बससेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर बस सुरू केल्या. गेली 9 महिन्यांपासून या मार्गावर बस सुरू होत्या. या बसमधील प्रवासी संख्या, त्यातून मिळणारे उत्पन्न आदीचा आढावा घेण्यात आला. या मार्गावर एका बसमध्ये केवळ 5 ते 7 प्रवासी प्रवास करीत असल्याचे पुढे आले. त्यामुळे या मार्गावरील बस बंद करण्यात आली. याशिवाय बर्डी ते उप्पलवाडी, बर्डी ते भांडेवाडीसह सहा मार्गावरील फेऱ्या कमी करण्यात आल्या.
आता केवळ 320 बस
तिन्ही ऑपरेटरच्या प्रत्येकी 12, अशा 36 बस बंद करण्यात आल्या. त्यामुळे आता रस्त्यावर केवळ 320 बस धावत असल्याचे परिवहन विभागातील सूत्राने नमूद केले. यापूर्वीही काही बसफेऱ्या बंद करण्यात आल्या होत्या. मात्र, पुन्हा सुरू करण्यात आल्या होत्या.

Web Title: Citizens reliance on private vehicles