ट्रकमधील मासे नागरिकांनी पळविले

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 जून 2018

नांदेड : बंगळूर वरून लखनऊला एका ट्रक मासे घेऊन जाण्यात येत होते. नांदेड मधील आसना बायपास जवळ चालकाला झोप आल्यामुळे त्याचा ट्रक वरील ताबा सुटला आणि ट्रक रस्त्यावरून खाली उतरला. पाऊस पडला असल्याने ट्रकची चाके चिखलात रूतून बसली होती.

याचाच फायदा घेत या भागीतल नागरिकांना ट्रक मधील मासे पळविले. काही जण तर ट्रकच्या कॅबीनवर चढूनसुध्दा मासे काढत होते. हा प्रकार आसना बायपास जवळ कामठा पाटी येथे रविवारी (ता. १०) सकाळी आठच्या सुमारास घडला. ट्रकचा चालक आणि क्लीनर जवळच्या हॉटेमध्ये जाऊन बसले होते. तेवढ्या वेळात स्थानिक नागरिकांनी माशावर हात मारून घेतला. अनेकांनी तर मृग नक्षत्र व रविवारचा चांगलाच आनंद लुटला. 

Web Title: Citizens of the truck caught by the fish