नागरिकांपुढेच अधिकाऱ्यांची झाडाझडती

नागपूर : झोन कार्यालयातील बैठकीत वृद्धेची तक्रार ऐकून घेताना प्रवीण दटके, आभा पांडे, सभापती अभिरुची राजगिरे, महापौर नंदा जिचकार, भगवान मेंढे, उपमहापौर दीपराज पार्डीकर; यावेळी उपस्थित ओसीडब्ल्यूचे अधिकारी.
नागपूर : झोन कार्यालयातील बैठकीत वृद्धेची तक्रार ऐकून घेताना प्रवीण दटके, आभा पांडे, सभापती अभिरुची राजगिरे, महापौर नंदा जिचकार, भगवान मेंढे, उपमहापौर दीपराज पार्डीकर; यावेळी उपस्थित ओसीडब्ल्यूचे अधिकारी.

नागपूर : प्रभागातील नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्यानंतर माजी महापौर व शहर भाजपाध्यक्ष प्रवीण दटके यांनी सोमवारी अधिकाऱ्यांना चांगलेच झापले. पाणी समस्येवरून त्यांनी अधिकाऱ्यांना दम देत प्रभाग 21मधील नागरिकांचे समाधान केले. समस्या न सुटल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा आभा पांडे यांनी दिला.
पाण्याच्या समस्येवर अपक्ष नगरसेविका आभा पांडे यांनी जलत्याग आंदोलन पुकारले होते. शनिवारी मध्यरात्री शहर भाजपाध्यक्ष प्रवीण दटके यांनी समस्या सोडविण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतले. सोमवारी त्यांनी सतरंजीपुरा झोन कार्यालयात अधिकाऱ्यांची बैठक घेतली. याप्रसंगी प्रभागातील नागरिकांनी समस्यांचा पाढा वाचला. मोठ्या प्रमाणात पाणी समस्या पुढे आली. काही समस्या जुन्याच असून, त्याकडे दुर्लक्ष केल्याने वाढल्याचे लक्षात आले. त्यामुळे दटके यांनी ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांना झापले. प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, महिलांनी पाण्याच्या समस्या मांडल्या. याशिवाय रस्ते, रस्त्यावरील खड्डे आदी समस्याही नागरिकांनी सांगितल्या. समस्या तातडीने निकाली काढा, अन्यथा कारवाई करणार, असा इशारा प्रवीण दटके यांनी दिला. सुमारे साडेतीन तास चाललेल्या बैठकीत अधिकाऱ्यांना चांगलाच घाम फुटला होता. आभा पांडे यांनीही वारंवार तक्रारी करून दुर्लक्ष केले जात असल्याबाबत नाराजी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com