सिटी केबलचे कार्यालय सील

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 जानेवारी 2017

जिल्हा प्रशासनाची कारवाई - 84 लाखांच्या मनोरंजन कराची थकबाकी
नागपूर - उत्पन्नाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून धडक कारवाई सुरू करण्यात आली असून, मनोरंजन कराची रक्कम थकविल्याने सिटी केबलचे मुख्य कार्यालय सील करण्यात आले.

दोन वर्षांपूवी सिटी केबलने वर्ष 2015 मध्ये आपली सेवा देण्यास सुरू केली. सिटी केबलचे हजारो ग्राहक असल्याचे सांगण्यात येते. शहर तहसीलदार प्रियदर्शिनी बोरकर यांनी सांगितले, 2015 पासून आतापर्यंत त्यांनी करमणूक कराची रक्कमच जिल्हा प्रशासनाकडे जमा केली नाही. त्यांच्याकडे 84 लाखांची थकबाकी आहे. ही रक्कम भरणा करण्यासंदर्भात त्यांना दोन- तीनदा नोटीस बजावण्यात आली. मात्र, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. केबलद्वारे प्रसारण दाखविण्याबाबतचा जिल्हाधिकारी यांच्याकडूनही परवाना घेतला नाही. त्यामुळे शनिवारी नारंग टॉवर येथील मुख्य कार्यालयाला सील ठोकण्यात आले. जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या आदेशावरून निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली. कारवाईत मंडळ अधिकारी राजेश देठे, तुषार सोमलकर, मडावी, टेकाम, चव्हाण आदी सहभागी होते.

Web Title: city cable office seal