पदाधिकाऱ्यांच्या दिल्लीत भेटीगाठी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जुलै 2018

नागपूर : शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात शहरातील प्रमुख पदाधिकारी आणि नगरसेवकांनी दिल्ली येथील महाराष्ट्राचे सहप्रभारी आशीष दुवा, सोनल पटेल यांची भेट घेतली. या वेळी पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या नेत्यांची माहिती देऊन त्यांची हकालपट्टी करण्याचीही मागणी करण्यात आली.

दिल्ली भेटीत शहरात भाजपच्या विरोधात कॉंग्रेसतर्फे केली जात असलेली आंदोलने, संघटन विस्तार, बूथ अध्यक्ष, बूथ कार्यकर्ते आदी प्रक्रियेची माहिती देण्यात आली. आगामी निवडणुकीत भाजपतर्फे देण्यात आलेली आश्‍वासने किती खोटी आणि फसवी आहेत हे घरोघरी पोहोचविल्या जात असल्याचे सांगितले. आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेसचे सर्व उमेदवार निवडून येथील अशा पद्धतीने नियोजन व प्रचार केला जात असल्याचीही माहिती दुवा आणि पटेल यांना देण्यात आली. भेटीत काही माजी मंत्री, आमदार करीत पक्षविरोधी कारवाया करीत असल्याचे सांगून त्यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली. महापालिकेच्या निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात केलेल्या कारवाया याचीही माहिती नेत्यांना देण्यात आली.
यावेळी विकास ठाकरे यांच्यसह अभिजित वंजारी, प्रशांत धवड, संदीप सहारे, संजय महाकाळकर, दीपक वानखेडे, हरीश ग्वालवंशी, नीतीश ग्वालवंशी, योगेश तिवारी, मनोज सांगोळे, प्रवीण गवरे, पंकज लोणारे, विवेक निकोसे, सूरज आवळे, राज खत्री, आसिफ शेख, हर्षल पाल, प्रशांत उके, प्रवीण सांदेकर आदी उपस्थित होते.

Web Title: city congress leaders meet senior leaders in delhi