नगर परिषद अभियंता एसीबीच्या जाळ्यात 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

उमरेड - नगर परिषदेचे नगरअभियंता रवी भास्कर गोविंदवार यांना 20 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी (ता. 27) दुपारी अडीचच्या सुमारास उमरेड नगर परिषद कार्यालयात रंगेहाथ पकडले. 

रवी गोविंदवार (वय 50, बायपास रोड, उमरेड) हे नगर परिषदेत अभियंतापदावर कार्यरत असून मौदा नगरपंचायतीत अतिरिक्त कार्यभारसुद्धा सांभाळतात. मौदा नगरपंचायतचे कंत्राटदार जितेंद्र प्रभाकर भटुरकर (वय 37, अयोध्यानगर, नागपूर) यांनी निविदेप्रमाणे सिमेंट रस्ते व नाली बांधकाम पूर्ण केले. मात्र, नगरपंचायतीच्या संपर्क अभियंत्यांनी तयार केलेल्या बिलाच्या पडताळणीसाठी व बिलावर स्वाक्षरी करून ते मौद्याच्या मुख्याधिकाऱ्यांकडे सादर करण्याकरिता नगरअभियंता रवी गोविंदवार यांनी तडजोडीअंती 20 हजार रुपयांची लाच रक्कम मागीतली. लाचेची 20 हजार रुपयांची रक्कम उमरेड नगर परिषद कार्यालयात देण्याचे ठरले. त्याप्रमाणे गुरुवारी 20 हजार रुपये स्वीकारताना एसीबीच्या पथकाने गोविंदवार यास रंगेहाथ अटक केली. कारवाईत विभागाचे पोलिस निरीक्षक युवराज पतकी, पोलिस हवालदार सुनील कळंबे, शिपाई मंगेश कळंबे, वसीम सयद, चालक परशुराम शाही आदींनी केली. 

Web Title: City Council Engineer

टॅग्स