चव्हाण यांच्यावर पाचशे कोटींचा दावा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जुलै 2018

नागपूर - सिडकोतील जमीन घोटाळाप्रकरणी काँग्रेसने भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यावर आरोप केले होते. हे आरोप खोटे असून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह तिघांवर ५०० कोटी रुपयांचा अब्रूनुकसानाचा दावा करण्यात आला असून तशी नोटीस पाठविली असल्याची माहिती लाड यांनी दिली.

विधानभवन परिसरात माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना त्यांनी सांगितले,  सिडको जमीन घोटाळ्याच्या संदर्भात विरोधकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माझ्यावर काँग्रेसने आरोप केले आहे. हे आरोप बिनबुडाचे असल्याचे लाड म्हणाले. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम, प्रवक्‍ते रणदीप सुरजेवाला आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर अब्रुनुकसानाचा दावा करण्याचा करण्यात आल्याचा त्यांनी सांगितले.

आमदार निर्णय घेत नाहीत हे मान्य असले तरी भ्रष्टाचार झाला आहे हे स्पष्ट आहे. हा भ्रष्टाचार मुख्यमंत्र्यांनी केला आहे की बाबूने शोधून काढावे, सरकारचे काम आहे. ते त्यांनी करावे.
- पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री.

Web Title: Claims worth Rs 500 crores on Chavan