"किचन'ला "क्‍लीन चिट'!

छायाचित्र
छायाचित्र

नागपूर : महापालिकेच्या हद्दीत असलेल्या शाळांना शिजविलेला पोषण आहार देणाऱ्या बचतगटांच्या किचनची तपासणी शिक्षण समिती व अन्न व औषधे प्रशासन विभागाद्वारे करण्याचे ठरविले होते. मात्र, तपासणी करण्यात आलेले एकही किचन मानकानुसार नसताना, त्यांना "क्‍लीन चिट' देत तपासणीचा सोपस्कार समितीने करीत तसाच अहवाल तयार केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 13 ऑगस्टला होणाऱ्या महापालिका शिक्षण समितीच्या बैठकीत हा अहवाल मांडणार येणार आहे.
शहरातील प्रतापनगर शाळेत 18 जुलै रोजी पोषण आहारात अळ्या निघाल्याची बाब उघडकीस आली होती.
दरम्यान, 30 जुलै रोजी महापालिकेत पार पडलेल्या शिक्षण समितीच्या बैठकीत शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे यांनीही शालेय पोषण आहारातील अनागोंदीप्रकरणी ठोस कारवाईचे निर्देश देण्याऐवजी केवळ किचनची तपासणी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शिक्षणाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तपासणीचा सोपस्कार पार पडला. यामध्ये सुसंस्कार बहुउद्देशीय शिक्षण संस्था, मा. वैष्णवी महिला बचतगट, प्रियदर्शिनी बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्था, दीपज्योती महिला बचतगट, शगुण महिला, वैभव महिला, सौरभ महिला विकास संस्था, नागपूर महिला मंडळ या आठही संस्थेच्या किचनची तपासणी करण्यात आली. नियमानुसार 2 हजार चौरस मीटरचे किचन असणे गरजेचे मॉ वैष्णवीकडे हजार फूट जागा, प्रियदर्शिनीकडे बोगस अनुभव प्रमाणपत्र, दीपज्योतीकडे 1304 चौरस फूट जागा, सौरभ, वैभव आणि शगुनचे एकच किचन अशा बऱ्याच अव्यवस्था असताना, प्रशासनाकडून त्यांना "क्‍लीन चिट' देण्यात आली असल्याचे समजते. अर्थात, राजकीय दबावापोटी केवळ तपासणीचा फार्स लावून सोपस्कार पार पाडल्या जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. दरम्यान, चौकशी समितीतील अधिकाऱ्यांना संपर्क केला असता, त्यांनीही यास दुजोरा देत, सर्वच बचतगटांचे किचन व्यवस्थित असल्याचेच सांगितले आहे हे विशेष.
कागदपत्रांची सत्यता पडताळलीच नाही
महिला बचतगटाकडून देण्यात आलेल्या ऑनलाइन कागदपत्रांची सत्यता पडताळल्याशिवायच आठही बचतगटांना कंत्राट बहाल करण्यात आले. यानंतर "सकाळ'ने प्रकरण लावून धरल्यानंतरही अद्याप शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर यांनी कागदपत्रांची सत्यता पडताळणी नसल्याचे दिसते. यावरून महापालिका प्रशासन विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराबद्दल किती गंभीर आहे हे दिसून येते. दुसरीकडे महापालिका आयुक्तांचे यावरील मौनही चिंतेचा विषय ठरतो आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com