स्वच्छता अभियानाची एैशीतैशी, ठिकठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 नोव्हेंबर 2019

नागपूर ः तीन दिवसांपासून शहरातील कचरा उचलला जात नसल्याने महापालिकेच्या स्वच्छता अभियानाची एैशीतैशी झाली आहे. शहराच्या अनेक भागांत रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग साचले असून शिवसेनेने चोवीस तासांत कचरा उचलला नाही तर आयुक्त आणि महापौर कार्यालयात फेकण्यात येईल, असा इशारा आज दिला.
महापालिकेने कचरा उचलण्यासाठी दोन कंत्राटदारांची नियुक्ती केली आहे. मात्र चार दिवस उलटून गेल्यानंतरही अनेक वस्त्यांमधून कचऱ्याची उचल अद्याप सुरू झालेली नाही. घंटा गाडी येत नसल्याने अनेकांच्या घरात कचरा पडून आहे. काहींनी तो रस्त्यावर फेकला. अनेक चौकांमध्ये कचऱ्याचे ढीग साचले आहेत.

शिवसेनेचा इशारा
महापालिका गंभीर नसून अद्यापही संबंधित कंत्राटदारांची कानउघाडणी केली नाही. आज शिवसेनेच्या शिष्टमंडळाने महापालिकेच्या उपायुक्तांची भेट घेतली. चोवीस तासाच्या आत शहरातील कचरा उचलला नाही तर तो महापौर आणि आयुक्तांच्या कक्षासमोर आणून टाकला जाईल, असा इशाराही देण्यात आला. यावेळी मुन्ना तिवारी, अब्बास अली, आशीष हाडगे, शशीधर तिवारी, लालसिंग ठाकूर, आकाश पांडे, शशिकांत ठाकरे, गौरव गुप्ता, अभिषेक धुर्वे, ललित बावणकर, गौरव सावरकर, पवन घुग्गुसकर, भोला वर्मा, शकीर हुसैन, गौरव शाहू, रोहित मित्रा, गणेश बनपेला, संजय झोडे आदींचा समावेश होता.

विनानंबरच्या गाड्या
बीव्हीजी आणि ए. जी. कंपनीला महापालिकेने कचरा उचलण्याचे कंत्राट दिले आहे. कंपनीच्या गाड्यांना नंबर प्लेट नाही. रजिस्ट्रेशन केले नाही तसेच आरटीओची परवानगी घेण्यात आलेली नाही. कचऱ्याच्या गाड्या झाकल्यासुद्धा नाहीत. या गाड्यांवर वाहतूक पोलिस आणि आरटीओने कारवाई करावी अशी मागणीही शिवसेनेच्यावतीने करण्यात आली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cleanliness Mission