कोराडी नवरात्रोत्सवात स्वच्छतेला प्राधान्य : पालकमंत्री

छायाचित्र
छायाचित्र

नागपूर ः कोराडी येथे श्रीमहालक्ष्मी जगदंबा संस्थान येथे नवरात्रोत्सवात देवीच्या दर्शनासाठी सुमारे 10 लाखांवर भाविक येतात. या दरम्यान यात्रेत आवश्‍यक त्या सुविधा व सुरक्षा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विविध शासकीय यंत्रणांनी आपापल्या समन्वयाने येत्या 10 दिवसांत सर्व कामे पूर्ण करावी, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिले.
जगदंबा संस्थानच्या परिसरात कायदा व सुव्यवस्थेच्या कामांचा आढावा बावनकुळे यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल, जगदंबा संस्थानचे अध्यक्ष ऍड. मुकेश शर्मा, उपाध्यक्ष अजय विजयवर्गी, सचिव केशवराव फुलझेले, सुशीलामंत्री, प्रेमलाल पटेल, कोषाध्यक्ष बाबूराव भोयर, विश्वस्त ऍड. जी. डी. चन्ने, नंदूबाबू बजाज, स्वामी निर्मलानंद महाराज, प्रभा निमोने, दयाराम तडसकर, अशोक खानोरकर, दत्तू समरीतकर, डॉ. नंदिनी त्रिपाठी, पोलिस उपायुक्त चिन्मय पंडित, उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
कोराडी येथे नवरात्रोत्सवाची सुरुवात 29 सप्टेंबरपासून होत आहे. यानिमित्त नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रम होतील. यासाठी मंदिर परिसरात विकासासाठी शासनाने विशेष आराखडा मंजूर केला असून, त्यानुसार सर्व कामे अंतिम टप्प्यात आहेत. भाविकांची गैरसोय होणार नाही. तसेच सुलभपणे दर्शन घेता यावे, यासाठी संस्थानतर्फे आवश्‍यक उपाययोजना पूर्ण केल्या आहेत. विकास आराखड्यातील अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना बावनकुळे यांनी दिल्या आहेत.
भक्तनिवासाची अद्ययावत इमारत पूर्ण झाली आहे. तसेच भाविकांसाठी बस थांबा, देवी मंदिराचा मुख्य गाभारा, सभा मंडप आदींची कामे पूर्ण झाली आहेत. पार्किगची व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, रस्त्यांची व्यवस्था येत्या 10 दिवसांत पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.

स्वच्छतेसाठी 60 कर्मचारी
स्वच्छतेसाठी 60 कर्मचारी दोन पाळ्यांमध्ये काम करतील. कचराकुंड्यांची व्यवस्था तसेच शौचालयांची व्यवस्था योग्य दृष्टीने करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पोलिस विभागाच्या मार्गदर्शनाखाली वाहनव्यवस्था व पार्किंगची व्यवस्था करण्यात यावी. भाविकांसाठी मदतकेंद्र, पोलिस चौक सुरू करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
......

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com