"क्‍लिनथॉन'च्या माध्यमातून प्लॅस्टिकमुक्त शहरावर भर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

नागपूर : राज्य सरकारच्या प्लॅस्टिक बंदी मोहिमेला बळकट करण्यासाठी "क्‍लिनथॉन'चे आयोजन करण्यात येत आहे. पेप्सिको कंपनीने जेम एन्विरो कंपनीच्या सहकार्याने शहरातील प्लॅस्टिक कचऱ्याची उचल व त्यावर प्रक्रिया करण्यासाठी पुढाकार घेतल्याने महापालिकेचा प्लॅस्टिकवर प्रक्रियेवरील खर्चाचा भार कमी होणार आहे. राज्यातील 36 जिल्ह्यामध्ये 100 संकलन केंद्र स्थापन करण्यात आले आहे.

केंद्र सरकारने प्लॅस्टिक बॉटल, पॅकेटचा वापर करणाऱ्या कंपन्यांना त्यावर प्रक्रिया करण्याचे बंधनकारक केले आहे. केंद्र सरकारच्या नव्या कायद्यानुसार पेप्सिको कंपनीने स्वतःच वापरत असलेल्या प्लॅस्टिकवर प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. घनकचरा व्यवस्थापन क्षेत्रातील आघाडीच्या जेम एन्विरोच्या सहकार्याने काल, अंबाझरी तलाव आणि उद्यान परिसरात "नागपूर क्‍लिनथॉन'चे आयोजन करण्यात आले होते. महापौर नंदा जिचकार, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकारी हेमा देशपांडे, जेम एन्व्हिरोचे संचालक सचिन शर्मा आणि पेप्सिको इंडियाच्या सस्टेनिबिलीटी प्रमुख जुही गुप्ता यांनी या अभियानात सहभाग घेतला. शिवाय जीएस महाविद्यालयाच्या शंभरावर विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी या अभियानात स्वयंस्फूर्तीने भाग घेत प्लॅस्टिक गोळा करून स्वच्छता केली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cleanthon, plastic free city