esakal | शिक्षक दिनाची पार्टी जीवावर बेतली, जलतरण तलावात बुडून लिपिकाचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

sanjay kathane

शिक्षक दिनाची पार्टी जीवावर बेतली, जलतरण तलावात बुडून लिपिकाचा मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बल्लारपूर (जि. चंद्रपूर) : शिक्षक दिन (teachers day) आणि त्यातच शाळेतील शिक्षकाचा वाढदिवस, असे दुहेरी औचित्य साधून शिक्षकांनी पार्टीचे नियोजन केले. मात्र, पार्टीच्या शेवटी जलतरण तलावात लिपिकाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना भालेराव इंग्लिश मीडियम शाळेत (bhalerao english medium school) रविवार सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली.

हेही वाचा: मुलीला जन्म दिल्यानंतर मातेचा मृत्यू, डॉक्टरांची चूक असल्याचा कुटुंबीयांचा आरोप

संजय भैय्याजी कठाने (वय ५५, कन्नमवार वार्ड), असे मृत लिपिकाचे नाव आहे. आज शिक्षक दिन आणि त्यातच शाळेतील एका शिक्षकांचा वाढदिवस असल्यामुळे सर्व शिक्षकांनी मिळून शाळेत एक पार्टी आयोजित केली. यामध्ये नृत्यासह विविध रंगारंग कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. अशातच जेवणाच्या वेळी संजय भैय्याजी कठाने जलतरण तलावाच्या दिशेने गेले. मात्र, खूप वेळ होऊनही ते परतले नाही. म्हणून त्यांचा शोध घेतला असता जलतरण तलावात तरंगताना आढळला. इतर सहकाऱ्यांनी त्यांना तत्काळ बाहेर काढून रुग्णालयात नेले. मात्र, तोपर्यंत उशिर झाला होता. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. विशेष बाब मृतकाच्या जवळच्या व्यक्तीच्या सांगण्यावरून मृतक संजय कठाने यांना उत्तम प्रकारे पोहता येत होते. असे असूनही त्यांचा मृत्यू कसा झाला? याबाबत सर्वत्र शंका कुशंका व्यक्त केली जात आहेत.

पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात दारूची सोय उपलब्ध होती. अनेक शिक्षकांनी त्याचा आस्वाद घेतल्याची शाळेत चर्चा सुरू आहेत. मात्र, घडलेल्या प्रकाराबाबत शाळेकडून मौन बाळगले आहे. मृत संजय कठाने यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात नेला आहे. घटनेचा तपास बल्लारपूर पोलिस करीत असून, शवविच्छेदनानंतर मृत्यूचे गूढ बाहेर पडेल असा अंदाज व्यक्त केला जात आहेत.

loading image
go to top