अभिलाष व रोहित खोपडे शरण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 नोव्हेंबर 2016

नागपूर - शंकरनगरातील क्‍लाऊड सेव्हन बारमधील तोडफोड आणि बारमालक सनी बम्रोतवारचा खुनाचा प्रयत्न करण्याच्या गुन्ह्यात आमदार कृष्णा खोपडे यांची मुले अभिलाष आणि रोहित खोपडे यांच्यासह पाच आरोपी अंबाझरी पोलिसांना शरण आले. अभिलाष खोपडे, रोहित खोपडे, राहुल यादव, गिरीश गिरधर आणि अक्षय खांडरे असे शरण आलेल्या आरोपींची नावे आहेत.

रविवारी दुपारी चार वाजतापर्यंत अभिलाष हा लकडगंजमधील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार घेत होता. मात्र, रात्री दहाच्या सुमारास त्याची अचानक प्रकृती दुरुस्त झाली आणि तो अंबाझरी पोलिसांकडे शरण आला. या प्रकाराची पोलिस वर्तुळात चर्चा होती.

शुभम हत्याकांडात एक आरोपी अटकेत
शुभम महाकाळकर हत्याकांडात अंबाझरी पोलिसांनी रविवारी निशांत मस्ते (19, रा. सुवर्णानगर, नारी रोड, जरीपटका) याला अटक केली. पोलिसांनी आतपर्यंत 7 आरोपींना अटक केली. निशांत मस्ते हत्याकांडानंतर शहर सोडून बाहेर गेला होता. मात्र, त्याला पोलिसांनी अटक केली.

Web Title: Cloud Seven Bar scandal