हिंगण्यात मेघे की घोडमारे? हिंगण्यात मेघे की घोडमारे? कार्यकर्त्यांत संभ्रम

हिंगणाः तहसील कार्यालयात मतमोजणीसाठी प्रशासनाने केलेल्या तयारीचे दृश्‍य.
हिंगणाः तहसील कार्यालयात मतमोजणीसाठी प्रशासनाने केलेल्या तयारीचे दृश्‍य.

हिंगणा (जि.नागपूर) :हिंगणा विधानसभा मतदारसंघात यावर्षीच्या निवडणुकीत भाजप-सेना महायुतीचे उमेदवार आमदार समीर मेघे व राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार माजी आमदार विजय घोडमारे यांच्यात दुरंगी सामना रंगला. दोन्ही उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली होती. यामुळे विजय आपलाच असा दावा दोन्हीही पक्षांकडून केला जात आहे. यामुळे मतमोजणीदरम्यान आमदारपदी समीर मेघे की विजय घोडमारे यांची वर्णी लागते, याकडे राजकीय पक्षांसह मतदारसंघातील जनतेचे लक्ष लागले आहे.
हिंगणा मतदारसंघात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी तहसील कार्यालयात पार पडणार आहे. मतमोजणीसाठी 14 टेबल लावण्यात आले आहेत. मतमोजणीच्या 31फेऱ्या होणार आहेत. प्रशासनाकडून कडेकोट सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली.मतदारसंघात 12 उमेदवार रिंगणात होते. मुख्य लढत भाजप-सेना महायुतीचे उमेदवार समीर मेघे व राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार विजय घोडमारे यांच्यात होणार आहे. दोन्ही पक्षांकडून विजयाचा दावा केला जात आहे. मतदारसंघात 57.15 टक्‍के मतदान झाले. बहुजन समाज पार्टी व बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार दमदार नसल्याने मताची जास्त विभागणी होणार नाही, असे राजकीय वर्तुळात बोलले जाते. यामुळे समीर मेघे व विजय घोडमारे यांच्यात आखाडा रंगणार आहे. मागील निवडणुकीत विजय घोडमारे हे आमदार समीर मेघे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. यावेळी मात्र घोडमारे यांनीच त्यांच्यासमोर आव्हान उभे केले. कुणबी समाजाचे दोन्ही उमेदवार असल्याने कुणबी समाजाने कोणत्या पक्षाला साथ दिली, यावर विजयाचे गणित अवलंबून आहे. विजयाचा दावा दोन्ही पक्षाकडून केला जात असला तरी मतदारांनी मात्र कोणाच्या झोळीत मते टाकली हे महत्त्वाचे आहे. मतमोजणीची प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी इंदिरा चौधरी व सहाय्यक निवडणूक अधिकारी मोहन टिकले, संतोष खांडरे यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास 104 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. पोलिस उपायुक्त विवेक मसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपायुक्त सिद्धार्थ शिंदे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सारिन दुर्गे यांच्यासह पोलिसांचा ताफा मतमोजणी परिसरात मोठ्या प्रमाणात तैनात केला जाणार आहे. मतमोजणीची प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी तालुका प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com