सीएम चषकाचे जिल्हास्तरावर दुहेरी आयोजन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 जानेवारी 2019

अकोला : मुख्यमंत्री चषक क्रीडा स्पर्धेतील जिल्हा स्तरावरील समान्यांच्या दुहेरी आयोजनाचा योग अकोल्यात घडून येत आहे. एका स्पर्धेचे रविवारी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले. दुसरी स्पर्धा 14 आणि 15 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, दोन्ही स्पर्धां संयोजकांनी आपली स्पर्धा अधिकृत असल्याचा दावा केला आहे.

अकोला : मुख्यमंत्री चषक क्रीडा स्पर्धेतील जिल्हा स्तरावरील समान्यांच्या दुहेरी आयोजनाचा योग अकोल्यात घडून येत आहे. एका स्पर्धेचे रविवारी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले. दुसरी स्पर्धा 14 आणि 15 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, दोन्ही स्पर्धां संयोजकांनी आपली स्पर्धा अधिकृत असल्याचा दावा केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे राज्यात मुख्यमंत्री चषक स्पर्धा आयोजित केली. या स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात विधानसभा निहाय तालुका स्तरावरील स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेतील विजेते संघ व खेळाडू जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. जिल्हा स्तरावरील स्पर्धा 5 ते 15 जानेवारीदरम्यान राज्यात सर्व लोकसभा मतदारसंघ निहाय आयोजित करण्यात येत आहेत. अकोल्यात मात्र जिल्हा स्तरावरील स्पर्धा दोन वेळा आयोजित केली जाणार आहे. त्यातील पहिल्या स्पर्धेचे उद्‍घाटन रविवारी पालकमंत्री डॉ.रणजित पाटील यांच्या हस्ते वसंत देसाई क्रीडांगणावर झाले.

यावेळी पालकमंत्र्यांसह माजी महापाैर उज्‍ज्वलताई देशमुख, माजी आमदार वसंतराव खोटरे, माजी आमदार नायारणराव गव्हाणकर, डॉ. अशोक आेळंबे, सोनल ठक्कर, आरती लढ्ढा, नगरसेवक आशीष पवित्रकार, नवल ढोके, चंद्रकांत बन्ने, योगेश गोतमारे, मिरा तायडे, विजय जयपिल्ले, डॉ. संजय धोत्रे, अक्षय नागापुरे, प्रवीण देशपांडे, संजय चाैधरी, गिरिष गोखले, सुधीर देशपांडे आदींची उपस्थिती होती. उद्‍घाटन समारंभाचे संचालन संजय तिकांडे यांनी केले तर आभार पवित्रकार यांनी मानले.

14 व 15 तारखेला पुन्हा स्पर्धा
मुख्यमंत्री चषक स्पर्धेंतर्गत अकोला जिल्ह्यातील विधानसभा निहाय विजेता संघांची स्पर्धा 14 व 15 जानेवारी 2019 रोजी होणार असल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, महानगर अध्यक्ष किशोर मांगटे पाटील, डॉ. संजय शर्मा, दिलीप सांगळे, अनुप गोसावी, उमेश गुजर यांनी प्रसिद्धी पत्रक काढून दिली. या स्पर्धेत अकोट, मूर्तिजापूर, बाळापूर, अकोला पूर्व, अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील खेळाडून सहभागी होणार असल्याचा दावाही भाजपचे प्रसिद्धी प्रमुख गिरिष जोशी यांनी काढलेल्या प्रसिद्धी पत्रकातून करण्यात आला आहे.

मंगळवारी बोलावली बैठक
भाजयुमोच्या पदाधिकाऱ्यांनी विधानसभा निहाय स्पर्धेच्या आयोजनात सहभाग घेतला. जिल्हास्तरावर आयोजित स्पर्धेसाठी मात्र त्याच कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्याचा आरोप करीत आता भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष डॉ. संजय शर्मा यांनी मंगळवारी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची बैठकी बोलाविल्याची माहिती आहे.

पालकमंत्र्यांना प्रदेशकडून मिळालेल्या आदेशानुसार आयोजित करण्यात आलेली स्पर्धाच अधिकृत आहे. प्रदेशकडून त्यासाठी मेडल आणि चषकही प्राप्त झाले आहे, शिवाय प्रमाणपत्रेही मिळाले आहेत. खेळाडूंचे नुकसान करण्याचे काम काही लोकांकडून सुरू आहे. रविवारपासून सुरू झालेल्या स्पर्धेतील विजेते संघ व खेळाडूच राज्य स्पर्धेसाठी पात्र ठरतील.
- डॉ. अशोक आेळंबे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य

रविवापासून जे सामने घेण्यात येत आहे, ते जिल्हास्तरीय सामने आहेत. त्याच्या आयोजनाची जबाबदारी पालकमंत्र्याकडे होते. प्रदेशकडून प्राप्त आदेशानुसार पालकमंत्र्यांनी स्पर्धा संयोजक म्हणून माझी नियुक्ती केली आहे. सीएम वॉररुमकडून विधानसभा निहाय विजेत्या खेळाडूंनी यादी प्राप्त झाली आहे. सीएम वॉर रुमच विदर्भ विभागाचे तीन प्रतिनिधी या स्पर्धेसाठी अकोल्यात उपस्थित आहेत. यानंतरही खेळाडूंना जिथे-जिथे आमंत्रण मिळेल, तिथे-तिथे त्यांनी उपस्थित रहावे. प्रदेश स्तरावरून कोणती स्पर्धा वैध आणि कोणती स्पर्धा अवैध आहे, हे ठरविले जाईल.
- गिरिष गोखले, स्पर्धा संजोजक

सीएम चषक स्पर्धेतील विधानसभा निहाय विजेत्या खेळाडूंची स्पर्धा 14 जानेवारीपासून आयोजित केली आहे. रविवारपासून सुरू झालेल्या स्पर्धेबाबत माहिती नाही. या स्पर्धेसाठी मला किंवा कोणत्याही आमदाराला निमंत्रण नाही. 14 जानेवारीपासूनची स्पर्धाच अधिकृत राहील.
-डॉ. संजय शर्मा, जिल्हाध्यक्ष भाजयुमो


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CM chashak organised