काहीही हं मुख्यमंत्री! अशी कशी केवळ पाच लाखांत आटोपली निवडणूक?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 नोव्हेंबर 2019

निवडणुकीत प्रत्येक उमेदवारांना तीन टप्प्यांत खर्चाची माहिती देणे आवश्‍यक आहे. सर्व उमेदवारांनी खर्चाची माहिती निवडणूक विभागाला दिली आहे. यानुसार निवडणुकीत शहरात भाजपपेक्षा कॉंग्रेसने जास्त पैसा खर्च केल्याचे समोर आले आहे.

नागपूर : विधानसभेची निवडणूक नुकतीच पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लढत असलेल्या दक्षिण-पश्‍चिम मतदारसंघाकडे अख्ख्या देशाचे लक्ष लागले होते. यासह कोणता उमदेवार किती पैसे खर्च खाकडे निवडणूक आयोगाचे लक्ष होते. कारण, मर्यादेपेक्षा जास्त पैसे खर्च केल्यास निवडणूक आयोगाकडून कारवाई करण्यात येते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच लाखांच्या आतच ही निवडणूक लढविल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे त्यांचे विरोधी कॉंग्रेसचे उमेदवार आशीष देशमुख यांनी 11 लाखांच्यावर खर्च केला. यामुळे "काहीही हं मुख्यमंत्री! अशी कशी केवळ पाच लाखांत आटोपली निवडणूक' असा प्रश्‍न सामान्यांना पडला आहे. 
निवडणुकीत प्रत्येक उमेदवारांना तीन टप्प्यांत खर्चाची माहिती देणे आवश्‍यक आहे. सर्व उमेदवारांनी खर्चाची माहिती निवडणूक विभागाला दिली आहे. यानुसार निवडणुकीत शहरात भाजपपेक्षा कॉंग्रेसने जास्त पैसा खर्च केल्याचे समोर आले आहे. अपक्ष उमेदवार मनोज सिंह यांनी कॉंग्रेस, भाजप उमेदवारांपेक्षा जास्त खर्च केला. त्यांनी 8 लाख 37 हजार 893 रुपये खर्च केल्याचे नमूद केले. 
निवडणूक विभागाले दिलेली माहिती 
दक्षिण-पश्‍चिम नागपूर 
उमेदवार पक्ष खर्च 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप 4,89,195 
आशीष देशमुख कॉंग्रेस 11,40,920 
दक्षिण नागपूर 
मोहन मते भाजप 8,50,306 
गिरीश पांडव कॉंग्रेस 6,12,187 
प्रमोद मानमोडे अपक्ष 7,74,548 
पूर्व नागपूर 
पुरुषोत्तम हजारे कॉंग्रेस 9,53,010 
कृष्णा खोपडे भाजप 7,56,565 
मध्य नागपूर 
बंटी शेळके कॉंग्रेस 8,72,935 
विकास कुंभारे भाजप 5,79,397 
पश्‍चिम नागपूर 
मनोज सिंह अपक्ष 8,37,893 
सुधाकर देशमुख भाजप 6,74,870 
विकास ठाकरे कॉंग्रेस 6,54,245 
उत्तर नागपूर 
सुरेश साखरे बसप 5,14,196 
नितीन राऊत कॉंग्रेस 3,58,795 
मिलिंद माने भाजप 3,10,877


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CM cleared election in just five lack!