मुख्यमंत्र्यांसह भाजप उमेदवार दाखल करणार अर्ज

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या, दक्षिण-पश्‍चिम मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याने दिल्ली, मुंबईसह अनेक व्हीव्हीआयपी शहरात दाखल होणार आहे. मुख्यमंत्र्यांसोबतच पाचही मतदारसंघातील भाजप उमेदवार नामांकन अर्ज दाखल करणार आहे. संविधान चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात येणार असल्याने संपूर्ण परिसराला जत्रेचे स्वरूप येणार आहे. 

विधानसभा निवडणुकीसाठी दक्षिण-पश्‍चिम नागपूर मतदार संघातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दक्षिणमधून माजी आमदार मोहन मते, पूर्वमधून आमदार कृष्णा खोपडे, मध्यमधून आमदार विकास कुंभारे, पश्‍चिममधून आमदार सुधाकर देशमुख, उत्तरमधून आमदार डॉ. मिलिंद माने उद्या, 4 सप्टेंबर रोजी नामांकन अर्ज दाखल करणार आहेत. उद्या, सकाळी 9 वाजता संविधान चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात येणार असून यानिमित्त भाजप शक्तिप्रदर्शन करणार आहे. मुख्यमंत्री अर्ज दाखल करताना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव, सरोज पांडे यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत. याशिवाय शहर भाजपाध्यक्ष प्रवीण दटके, आमदार प्रा. अनिल सोले, आमदार गिरीश व्यास, महापौर नंदा जिचकार, मनपातील सत्तापक्ष नेते संदीप जोशी, माजी मंत्री ऍड. सुलेखा कुंभारे, अशोक मेंढे, संदीप जाधव, राजू हडप, शिवानी दाणी, डॉ. कीर्तीदा अजमेरा, धर्मपाल मेश्राम, दिलीप गौर, किशन गावंडे, बंडू राऊत, अविनाश ठाकरे, भोजराज डुंबे, संजय ठाकरे यांच्यासह नगरसेवक, मनपातील पदाधिकारी, पक्षाचे पदाधिकारी उपस्थित राहतील. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cm, devendra fadanvis