पोहरागडच्या विकासासाठी उर्वरित १०० कोटी देण्याची घोषणा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 डिसेंबर 2018

पोहरादेवी (जिल्हा यवतमाळ) : बंजारा समाजाचे धार्मिक अधिष्ठान असलेल्या पोहरादेवी येथील प्रस्तावित १२५ कोटींच्या विकास आराखड्यातील २५ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उर्वरित १०० कोटी सुद्धा मंजूर करत असल्याची घोषणा केली.

आज पोहरादेवी (जि. वाशिम) येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते संत सेवालाल महाराज नंगारा वस्तुसंग्रहालयाचे भूमिपूजन झाले. या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली. 

पोहरादेवी (जिल्हा यवतमाळ) : बंजारा समाजाचे धार्मिक अधिष्ठान असलेल्या पोहरादेवी येथील प्रस्तावित १२५ कोटींच्या विकास आराखड्यातील २५ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उर्वरित १०० कोटी सुद्धा मंजूर करत असल्याची घोषणा केली.

आज पोहरादेवी (जि. वाशिम) येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते संत सेवालाल महाराज नंगारा वस्तुसंग्रहालयाचे भूमिपूजन झाले. या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली. 

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून संत डॉ. रामराव बापू, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री डाॅ. रणजित पाटील, दादाजी भुसे, मदन येरावार, खा.भावना गवळी, खा.प्रताप जाधव, खा.संजय धोत्रे, आ.मनोहराव नाईक, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड, वाशिम जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, यवतमाळ जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे, आ.हरिभाऊ राठोड, आ.तुषार राठोड,आ.प्रदिप नाईक,कर्नाटक चे आ.प्रभू चव्हाण, आ.निलय नाईक, आ.गोपीकीशन बाजोरीया, आ.श्रीकांत देशपांडे,आ.राजेंद्र पाटणी, आ.राजू तोडसाम, आ.नागेश पाटील यांच्यासह वाशिमचे जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत मिश्रा आदी उपस्थित होते.

प्रस्ताविकात ना. संजय राठोड यांनी केलेल्या मागण्यांची दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बंजारा समाजाला इतर राज्यांप्रमाणे अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करण्यासोबतच बंजारा कला अकादमी, बंजारा भाषेचा आठव्या सूचित समावेश, बंजारा समाजातील कलाकुसरीच्या कामांसाठी बंजारा क्लस्टर आणि इतर मागण्यांसंदर्भात राज्य शासन केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवून बंजारा समाजाला न्याय देईल, अशी ग्वाही दिली. बंजारा समाजातील विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी बंजारा भाषेतून भाषणाला केली सुरूवात. बंजारा समाजाला दिशा देण्याचे काम संत सेवालाल महाराज यांनी केले. ज्या पवित्र भूमीत संत सेवालाल महाराज यांनी समाधी घेतली. त्याच ठिकाणी त्यांचा सर्व इतिहास नंगारा वस्तूसंग्रहलायामध्ये ठेवण्यात येणार आहे. या ऐतिहासिक कामासाठी निधीची कामरतात पडू देणार नाही, असे ते म्हणाले.

प्रस्तावित आराखड्यातील उर्वरित शंभर कोटी रूपये विकास कामांसाठी देण्याची घोषणाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. पोहरागडाला जोडण्यासाठी सात राष्ट्रीय महामार्ग मंजूर करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री यांनी दिली. यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गावर पोहरागड येथे रेल्वे स्टेशन राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. सरकार बंजारा समाजाच्या पाठीशी गंभीरपणे उभे राहील, असे आश्वासन यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जय सेवालाल असा नारा देऊन भाषणाची सुरुवात केली. या भूमिपूजन कार्यक्रमासाठी पालकमंत्री संजय राठोड यांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे, असे ते म्हणाले.  कै. वसंतराव नाईक यांनासुध्दा शिवसेनेबद्दल प्रेम होते. त्यामुळे शिवसेना राज्यात गंभीर पणे आजही उभी आहे. नंगारारुपी पवित्र वास्तूचे भूमिपूजन आमच्या हस्ते होते हे आमचे भाग्य आहे. शूरवीर बंजारा समाजाला मागण्या मागण्याची वेळ येऊ नये. आज हा समाज शांत आहे. त्यांनी एल्गार पुकारण्याआधी त्यांच्या मागण्या सोडवा, अशा सूचनाही ठाकरे यांनी याप्रसंगी केल्या.

बंजारा समाजाला शिक्षणासह मुलभूत सोई सुविधा सरकार उपलब्ध करून देणार असे आश्वासनही शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले.

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भयमुक्त राज्य घडविण्याचा आवाज पोहचविण्यासाठी आज ठाकरे व मुख्यमंत्री फडणवीस यांनी पोहरागडमध्ये नंगारा वाजविल्याने अजून राज्यात वीस वर्षे भाजप व शिवसेनेचे सरकार राहील, असा विश्वास व्यक्त केला.

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी बंजारा समाजाबद्दल असलेल्या भावनिक नात्याचा उलगडा केला. मी तुमचीच मुलगी आहे असे सांगून त्यांनी बंजारा भाषेतून यावेळी संवाद साधला.

प्रास्ताविक भाषणात महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी नंगारा वस्तूसंग्रहालयसाठी आणखी शंभर कोटी रूपयांची तरतूद करण्याची मागणी केली. बंजारा समाजाला सुध्दा राज्यात अनुसूचित-जमाती मध्ये आरक्षण देण्याची मागणी यावेळी पालकमंत्री राठोड यांनी केली. तांड्यात तीनशे लोकवस्ती असलेल्या गावांना ग्रामपंचायतीचा दर्जा द्या.

वसंतराव नाईक महामंडळाला त्वरीत अध्यक्ष देण्याची मागणी केली. समाजातील लोक वनखाते आणि महसूलच्या जागेवर शेती करून संसाराचा गाडा लोटत आहे. त्यांना कायमस्वरूपी हक्काचे लिजपटे देण्याची मागणी त्यांनी केली. बंजारा समाजसाठी अकादमी, भाषेला सूचित समावेश, शिष्यवृत्ती, होस्टेल अशा विविध मागण्या संजय राठोड यांनी याप्रसंगी मांडल्या. कार्यक्रमाचे संचालन प्रा. राजेश चव्हाण, प्रा. संजय चव्हाण, सोमेश्वर पुसदकर, रवींद्र पवार यांनी केले.

बंजारा समाज संस्कृतीचे दर्शन
मुख्यमंत्री फडणवीस व शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे कार्यक्रम स्थळी आगमन होताच बंजारा समाजातील मुलींनी पारंपारीक वेशभूषेत मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी संपूर्ण परिसर 'एकच लाल सेवालाल' या जयघोषाने दणाणून निघाला होता. मुख्यमंत्र्यांनी या उच्चांकी गर्दीची तुलना माणसांचा समुद्र अशी केली.

Web Title: CM Devendra Fadnavis announces 100 Cr aid for Pohragadh Development