उद्धव ठाकरे आमचे मार्गदर्शक : देवेंद्र फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 डिसेंबर 2018

वाशिम जिल्ह्यातील पोहरागड येथे संत सेवालाल महाराजांच्या स्मारकाच्या उद्घाटनाला फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात मराठा समाजाला आरक्षण दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. राज्याचा गाडा हाकण्याचे सोपे नसल्याचेही उद्धव यांनी म्हणत मुख्यमंत्र्यांची पाठराखण केली. 

वाशिम : युतीमध्ये ठिणगी पडलेली असतानाच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाशिममध्ये एका कार्यक्रमाच्या उद्घाटनादरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आमचे मार्गदर्शक असल्याचे म्हटले आहे.

वाशिम जिल्ह्यातील पोहरागड येथे संत सेवालाल महाराजांच्या स्मारकाच्या उद्घाटनाला फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात मराठा समाजाला आरक्षण दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. राज्याचा गाडा हाकण्याचे सोपे नसल्याचेही उद्धव यांनी म्हणत मुख्यमंत्र्यांची पाठराखण केली. 

यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणाची सुरवात करतानाच उद्धव ठाकरे यांना मार्गदर्शक म्हणत म्हटले, की सेवालाल महाराजांचे देशाच्या वाटचालीत मोठे योगदान आहे. सेवालाल स्मारकासाठी 100 कोटी रुपये देण्याची घोषणा मी आज करतो. ब्रिटीशांविरोधात पहिला एल्गार सेवालाल महाराजांनी केला होता. पोहरागड हे देशाशी जोडण्याचे काम करणार आहोत. पोहरागड रेल्वेनेही जोडण्यात येईल. बंजारा समाजाचे हे श्रद्धास्थान आहे.

Web Title: CM Devendra Fadnavis halis Uddhav Thackeray in Washim