मुख्यमंत्र्यांनी जनतेला विचारला प्रश्न अन् मिळाले 'हे' उत्तर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

नागपुरात जागोजागी नागरिक त्यांच्या यात्रेचे स्वागत करण्यासाठी थांबली होती. पावसाळी वातावरण तरी चौकाचौकात गर्दी दिसत होती. मुख्यमंत्र्यांनी विचारतात भाजपला जनादेश देणार काय? जनता म्हणते होय. मोदींना जनादेश देणार काय असे विचारल्यानंतर नागरिक आणखी जोराने आवाज देतात, होय. 

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला नागपुरात नागरिकांनी दिलेला उत्स्फुर्त प्रतिसाद पाहून मुख्यमंत्रीच भारावून गेले आहेत. यावेळी त्यांनी नागरिकांना काही प्रश्न विचारले आणि त्यांना उत्तरेही तेवढ्याच जोशात मिळाली.

नागपुरात जागोजागी नागरिक त्यांच्या यात्रेचे स्वागत करण्यासाठी थांबली होती. पावसाळी वातावरण तरी चौकाचौकात गर्दी दिसत होती. मुख्यमंत्र्यांनी विचारतात भाजपला जनादेश देणार काय? जनता म्हणते होय. मोदींना जनादेश देणार काय असे विचारल्यानंतर नागरिक आणखी जोराने आवाज देतात, होय. मग पुढचा प्रश्न नितीनजींना जनादेश देणार ना? होय उत्तर आल्यावर लगोलग प्रश्न येतो मला जनादेश देणार? होय म्हणत भारतमाता की जयचा घोष निनादतो.

मी महाराष्ट्राच्या विकासाची कामे हाती घेतोय. तुम्ही बरोबर आहात. आम्हाला निवडून द्या आपण विकास करू चे भावनिक आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले. मग मी आता निवडणूक जिंकल्यावरच तुम्हाला भेटायला येतो आशीर्वाद द्या आणि आदेशही द्या मुख्यमंत्री म्हणतात. पुन्हा एकदा जयजयकार होतो अन् जनादेश यात्रा पुढे जाते. आज नागपुरात ठिकठीकाणी हेच चित्र होते. आता फडणवीस भंडाऱ्याकडे निघाले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CM Devendra Fadnavis Mahajanadesh yatra arrives in Nagpur