विरोधी पक्षांनी आत्मचिंतन करावे : मुख्यमंत्री 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

भाजपच्या महाजनादेश यात्रेनिमित्त मुख्यमंत्री फडणवीस वर्धा जिल्ह्यात आले असता जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री  चंद्रशेखर बावनकुळे, खासदार रामदास तडस, आमदार डॉ. पंकज भोयर यांची उपस्थिती होती. 

वर्धा : काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी ईव्हीएमला दोष देण्याऐवजी आत्मचिंतन करावे. मतदानाकरिता ईव्हीएमचा वापर व्हायला लागल्यावर काँग्रेस आणि इतर पक्षांनी देशात आणि विविध राज्यांमध्ये १० वर्षे सत्ता भोगली. त्यामुळे या मुद्द्यात तथ्य नाही. त्यापेक्षा जनतेत जाऊन यापूर्वी केलेल्या चुकांची माफी  मागावी व सहानुभूती मिळवावी, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (ता. 2) येथे लगावला. 

भाजपच्या महाजनादेश यात्रेनिमित्त मुख्यमंत्री फडणवीस वर्धा जिल्ह्यात आले असता जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री  चंद्रशेखर बावनकुळे, खासदार रामदास तडस, आमदार डॉ. पंकज भोयर यांची उपस्थिती होती. 

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, पुढील पाच वर्षे दुष्काळ मुक्तीसाठी खर्ची घालणार आहे. सिंचनाकरिता आम्ही भरघोस गुंतवणूक केली आहे. तेलंगणातील वाहून जाणारे पाणी महाराष्ट्रात ४८० किलोमीटरपर्यंत आणण्यात येईल. त्यापैकी १०० टीएमसी पाणी पूर्व व पश्चिम विदर्भातील प्रत्येकी चार जिल्ह्यांकरिता, तर १६७ टीएमसी पाणी गोदावरी नदीत सोडून उत्तर महाराष्ट्राकरिता उपयोगात आणले जाईल. केंद्रीयमंत्री  नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील ८९ औद्योगिक प्रकल्पांकरिता २० हजार कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निमिर्ती होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CM Devendra Fadnavis talks on Opposition leaders