मुख्यमंत्र्यांसह सर्व उमेदवारांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

मुख्यमंत्र्यांसह सर्व उमेदवारांनी  दाखल केला उमेदवारी अर्ज

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शक्तिप्रदर्शन करून भाजपच्या सर्व सहा उमेदवारांनी आज विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले. संविधान चौकातून ते आकाशवाणी या दरम्यान मुख्यमंत्री खुल्या जीपवर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले. त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्राच्या प्रभारी सरोज पांडे आदी नेते उपस्थित होते. 
ढोलताशांचे पथक, वाजंत्री, भाजपचे झेंडे घेऊन शेकडो कार्यकर्ते मिरवणुकीत सहभागी झाले होते. 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर दक्षिण-पश्‍चिम विधानसभा मतदार केंद्रातून उमेदवारी अर्ज दाखल केला. पश्‍चिम नागपूरमधून आमदार सुधाकर देशमुख, उत्तर नागपूरमधून आमदार डॉ. मिलिंद माने, पूर्वमधून आमदार कृष्णा खोपडे, दक्षिण नागपूरमधून माजी आमदार मोहन मते, मध्य नागपूरमधून आमदार विकास कुंभारे यांनी उमेदवारी दाखल केली. सकाळी दहा वाजता सर्व उमेदवार व कार्यकर्ते संविधान चौकात गोळा झाले. येथे बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करून मिरवणुकीने सर्व उमेदवार आकाशवाणी चौकात पोहोचले. मुख्यमंत्र्यांनी दुपारी 12 वाजता उमेदवारी अर्ज दाखल केला. 
विकासाची लाट : मुख्यमंत्री 
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील सर्व जागा भाजप जिंकेल, असा विश्‍वास माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. जनतेचा आशीर्वाद घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत. यंदा युती घवघवीत यश मिळणार आहे. राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात 
विकासकामे केली आहेत. पन्नास वर्षांत झाला नाही एवढा विकास पाच वर्षांत केला. यावेळी आमच्या कामांची लाट आहे. त्यामुळे आम्हीच जिंकू, असाही दावा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com