मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याने जिल्हा परिषदेत धावपळ

File photo
File photo

नागपूर : राज्य स्वच्छ भारत अभियान अग्रेसर असल्याचा जिल्हा परिषदेचा दावा कितपत खरा आहे याची पडताळणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ग्रामीण भागातील स्वच्छतेची स्वत: पाहणी करणार असल्याने पदाधिकाऱ्यांमध्ये चांगलीच धावपळ सुरू झाली आहे. मुख्यमंत्री जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतीला भेट देणार आहे.
मुख्यमंत्र्यांना कोणती ग्रामपंचायत दाखवायची यावर सध्या काथ्याकुट सुरू असून अध्यक्षा निशा सावरकर यांनी तीन गावांची नावे प्रशासनाला सुचविल्याची माहिती आहे. 29 सप्टेंबरला मुख्यमंत्री फडणवीस एका ग्रामपंचायतीला भेट देऊन स्वच्छतेची पाहणी करणार आहेत. नागपूर जिल्हा हागणदारीमुक्त घोषित करण्यात आला असून स्वच्छता मिशनमध्येही अग्रेसर असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, अनेक गावांमध्ये आजही नागरिक उघड्यावर शौचालयास जात असल्याचे सांगण्यात येते. मुख्यमंत्र्याच्या भेटीत प्रशासनाचे पितळ उघडे पडता कामा नये, याची प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. उत्तम असलेल्या ग्रामपंचायतीची निवड करण्याचे प्रशासनाचे प्रयत्न आहे. यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर यांची मदत प्रशासनाने मागितली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार यासंदर्भात नुकतीच एक बैठक अध्यक्षांच्या कक्षात पार पडली. याला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश केदार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमिला जाखलेकर, रवींद्र भुयार, महिला बालकल्याण व आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांना दाखवायच्या गावाबाबत बैठकीत चर्चा झाली. प्रशासनाची किरकिरी होता कामा नये म्हणून निवडीची संपूर्ण जबाबदारी अध्यक्षांना देण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com