आज मुख्यमंत्र्यांचा रोड शो

आज मुख्यमंत्र्यांचा रोड शो

नागपूर : दक्षिण-पश्‍चिम विधानसभा मतदारसंघातील प्रचाराच्या अंतिम दिवशी मुख्यमंत्री रोड शो करणार आहेत. दोन किलोमीटरच्या या रोड शोमध्ये सुमारे दहा हजारांहून अधिक समर्थक सहभागी होतील, असा दावा मुख्यमंत्र्यांचे प्रचारप्रमुख संदीप जोशी यांनी पत्रपरिषदेत केला. 
शनिवारी प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. माटे चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून रोड शो प्रारंभ होईल. पुढे गोपालनगर दुसरा बस स्टॉप, पडोळे चौक, दीनदयालनगर चौक मार्गाने भेंडे ले आउट चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर रोड शोचा समारोप होईल. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचे जाहीर भाषण होईल. हा मार्ग दोन किलोमीटरचा असून, रोड शोच्या मार्गावर मुख्यमंत्र्यांचे जंगी स्वागत होणार आहे. या रोड शोमध्ये वारकरी मंडळ, छत्तीसगडी नृत्य पथक, लेझीम पथक, दांडपट्टाधारक आदींचा समावेश राहणार असून, सुमारे दहा हजार भाजप समर्थक रोड शोमध्ये सहभागी होतील. पत्रपरिषदेला मुन्ना जयस्वाल, चंदन गोस्वामी उपस्थित होते. 
संपूर्ण राज्याचे नेतृत्व करणाऱ्या मुख्यमंत्री फडणवीसांनी स्वत:च्या मतदारसंघात केवळ दोन सभा घेतल्या आहेत. गेल्या दोन टर्म मुख्यमंत्री येथून आमदार म्हणून निवडून आले आहेत. यंदा येथील प्रचाराची संपूर्ण जबाबदारी संदीप जोशी, मुन्ना जयस्वाल, अविनाश ठाकरे यांच्याकडे दिली आहे. त्यामुळे अंतिम दिवस रोड शोच्या माध्यमातून गाजणार असल्याची घोषणा संदीप जोशी यांनी केली आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com