#NagpurWinterSession : महाविकास आघाडी पाच वर्षांची 'मॅच' जिंकणार : मुख्यमंत्री (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 डिसेंबर 2019

विरोधी पक्षाकडून सरकारला कोंडीत पकडण्यासाठी रणनीती ठरविण्यासाठी मंगळवारी महाविकास आघाडीची बैठक शिवसेनेच्या दालनात सकाळी नऊ वाजता सुरू झाली होती. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते.

नागपूर : हिंदूत्व तसेच शेतकऱ्यांच्या विषयावर भाजप हिवाळी अधिवेशनात वरचढ होऊ पाहात आहे. आम्ही तीन टोकाचे तीन पक्ष आहेत, असे त्यांना वाटत आहे. परंतु, आम्ही केलेला हा प्रयोग नवीन आहे. जनता याचे स्वागत करीत आहे. माझ्या टीममध्ये सर्वच दिग्गज आहेत. यामुळे पुढील पाच वर्षे महाराष्ट्राचा विकास करून महाविकास आघाडी ही मॅच जिंकणार आहोत, असा विश्‍वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी व्यक्त केला. 

महत्त्वाची बातमी - NagpurWinterSession : शेतकरी मदतीवरून भाजपचे ढोंग : जयंत पाटील

विरोधी पक्षाकडून सरकारला कोंडीत पकडण्यासाठी रणनीती ठरविण्यासाठी मंगळवारी महाविकास आघाडीची बैठक शिवसेनेच्या दालनात सकाळी नऊ वाजता सुरू झाली होती. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. तिन्ही पक्षांचे मोठे नेते उपस्थित होते. वादग्रस्त मुद्दे बाजूला ठेऊन किमान समान कार्यक्रमावर भर द्यावा, अशा सूचना यावेळी करण्यात आल्या. सरकार पाच वर्षे चालावे यासाठी ही बैठक होती. राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री जयंत पाटील, अजित पवार, बाळासाहेब थोरात, खासदार संजय राऊत आदी नेते उपस्थित आहे. 

Image may contain: text

रणनीती ठरवण्यासाठी महाविकास आघाडीची बैठक

आज देशात अशांतता निर्माण केली जात आहे. विकास करण्यासंदर्भात निश्‍चित दिशा नसल्याने व उत्तर नसल्याने प्रश्‍न निर्माण केले जात आहे. जनतेला चिंतेत ठेवायचा, अस्वस्थ वातावरण निर्माण करण्यासाठी ठिणग्या टाकण्याचे काम होत आहे. हिंदुत्वाच्या मुद्यावर कसे उत्तर द्यायचे हे मला चांगले ठाऊक आहे, ते मला शिकवण्याची गरज नाही, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. 

क्लिक करा - NagpurWinterSession : शेतकरी मदतीवरून भाजपचे ढोंग : जयंत पाटील

आता राज्याचा प्रश्‍न सोडवताना विरोधकांकडून घेरण्याचे प्रयत्न होतील. परंतु, महाविकास आघाडीच्या आमदारांनी यांना बळी न पडता, प्रत्युत्तर देण्यासाठी एखाद्या वेळी सभागृहात वेलमध्ये येण्याचा शिरण्याचा ते प्रयत्न करतील, त्यांनी उडी मारली म्हणून आम्ही असे करू नये. महाविकास आघाडीचे सरकार किमान समान कार्यक्रमानुसार चालणार आहे. हे सरकार पाच नव्हे तर अनेक वर्षे चालेल फक्त जनतेच्या भल्यासाठी वादग्रस्त मुद्दे बाजूला ठेवावे, असेही यावेळी बैठकीतून इतर नेत्यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CM says The government will win a five-year "match"