कचऱ्यातील खाद्यान्नापासून "सीएनजी'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

नागपूर : शहरात दररोज गोळा होणाऱ्या कचऱ्यात 50 टन खाद्यान्न पदार्थ असतात. यापासून सीएनजी तयार करण्याचा मनपाचा प्रयत्न आहे. सीएनजी "आपली बस'साठी वापरण्यात येणार आहे. त्यामुळे दरवर्षी होणाऱ्या 80 ते 90 कोटींच्या नुकसानीतही घट होईल. मेट्रो रेल्वे व आपली बसचे मार्ग एकच राहणार नाही, याचीही काळजी घेण्यात येणार आहे. आपली बसच्या अनेक मार्गात बदल करण्यात येणार असल्याचे आयुक्त अभिजित बांगर यांनी नमूद केले.

शहरातील परिवहन सेवा अत्याधुनिक व प्रवाशांसाठी सहज करण्याचा मनपाचा प्रयत्न आहे. महापालिकेने सध्या अरुंद रस्त्यांसाठी मिनी बसेसची सेवा सुरू केली. याशिवाय सीएनजीवरील पहिल्या टप्प्यात ट्रॅव्हल टाईम, आर. के. सिटी व हंसा ट्रॅव्हलच्या प्रत्येकी 70, अशा एकूण 210 बसेस सीएनजीवर धावणार आहे. राज्य सरकारने इलेक्‍ट्रिक बससाठी दिलेल्या निधीतून 5 इलेक्‍ट्रिक बस धावणार आहे. मेट्रो रेल्वे सुरू झाल्यानंतर काही बससेचा वापर फिडर सर्व्हिससाठी करण्यात येणार आहे. याशिवाय मेट्रो मार्गावरील काही बसेस बंद करून ज्या भागात अजूनही शहर बस नाही, तेथे वापरण्यात येणार आहे. यासाठी 'डिम्‌स'कडून नव्याने आराखडा तयार करण्यात येत आहे.
मनपात दिसेल बसमधील प्रवासी
परिवहन सेवेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात येणार आहे. कंडक्‍टरकडून तिकिट देण्यात गैरव्यवहार करण्यात येते. तो रोखण्यासाठी उच्च दर्जाचे तंत्रज्ञान वापरण्यात येईल. बसमध्ये किती प्रवासी आहे, हे महापालिकेत बसून बघता येईल, असेही आयुक्तांनी सांगितले.

कंडक्‍टरचे गैरप्रकार रोखण्यासाठी पोलिसांसोबत चर्चा
आपली बसमध्ये अनेकदा कंडक्‍टर प्रवाशांना तिकिट देत नाही. त्यांच्याकडून गैरव्यवहार होतो. तूर्तात याबाबत पोलिस आयुक्तांसोबत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी चर्चा करण्यात आली आहे. कंडक्‍टर पुरविणारे संबंधित कंपनीवरही जबाबदारी निश्‍चित करण्यात आल्याचे आयुक्त म्हणाले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CNG from waste food