कामगारांच्या संपामुळे कोळसा उत्पादन ठप्प

file photo
file photo

नागपूर : केंद्र सरकारने कोळसा खाण क्षेत्रात शंभर टक्के परकीय गुंतवणुकीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरुद्ध देशभरातील कोळसा खाण कामगार संघटनांनी मंगळवारी (ता. 23) लाक्षणिक संप पुकारला. संपाला 90 टक्के प्रतिसाद मिळाल्याचा दावा संघटनेने केला आहे. 27 तारखेपर्यंत संप सुरू राहणार असल्याचेही संघटनेचे म्हणणे आहे.
वेस्टर्न कोल लिमिटेडच्या सर्वच खाणीतील कामगार आज संपात सहभागी झाल्याने उत्पादन ठप्प झाले होते. संपातून शाळेच्या बसवरील चालकांसह डॉक्‍टर व अति आवश्‍यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना वगळत आले होते. त्या कर्मचाऱ्यांची संख्या पाच ते सात टक्के आहे. कोळसा खाण कामगारांची राष्ट्रीय संघटना नॅशनल फेडरेशनने कोल इंडियामध्ये तिच्या इतर उपकंपन्यांचे विलीनीकरण करून देशात एकमेव राष्ट्रीय कोळसा कंपनी करावी, अशी मागणी केली आहे. या क्षेत्रात शंभर टक्के परकीय गुंतवणुकीला केंद्र सरकारने मंजुरी देण्याच्या निर्णयाचा संघटनेने विरोध केला. या निर्णयामुळे कोळसा कंपन्या व खाणीत काम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ येईल. त्यामुळे केंद्राने निर्णय मागे घ्यावा, अशी मुख्य मागणी असल्याचे राष्ट्रीय खाण मजदूर फेडरेशनचे महासचिव एस. क्‍यू. झमा म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com