#Motivation 'गोबरगॅस'च्या टाकाऊ पदार्थापासून दगडी कोळसा (व्हिडिओ)

राघवेंद्र टोकेकर 
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

शेण व गोबरगॅस कितीही महत्त्वाचे असले तरी टाकाऊ पदार्थाची समस्या कायमच असते. एका युवकाने या टाकाऊ पदार्थापासून दगडी कोळशाची निर्मिती केली आहे. या संशोधनामुळे देवलापार येथील गो-विज्ञान अनुसंधान केंद्रातील मोठी समस्या सुटणार आहे. 

नागपूर : भारत कृषी प्रधान देश असल्यामुळे येथे गायीचे फार महत्त्व आहे. त्यामुळेच गायीला मातेचा दर्जा दिला असून, तिची पूजा केली जाते. जशी गाय महत्त्वाची आहे; तसे तिचे शेणही फार महत्त्वाचे आहे. गावात शेणाचा उपयोग घर सारवण्यापासून तर सडा टाकण्यासाठी केला जातो. यामुळे घर चांगले दिसते. तसेच शेणाच्या गोवऱ्या टाकल्या जातात. या गोवऱ्यांचा अनेक कामात उपयोग केला जातो. गोवऱ्यांचा उपयोग हवण करताना होत असल्यामुळे आता त्याची ऑनलाईन विक्री सुरू झाली आहे. यावरून शेणाचे महत्त्व आपण समजू शकतो. 

हेही वाचा - कौतुकास्पद! नवरदेवाऐवजी निघणार नवरीची वरात 

शहरात मात्र गोठ्यात व रस्त्यांवर पडलेल्या शेणाचा अनेकांना त्रास होतो. अनेकजण त्यापासून दूरच राहणे पसंद करतात. शेणाचा वास येत असल्यामुळे दुरूनच जाण्याला पसंदी देतात. गाय घरासमोर आली असता तिला हाकलून लावले जाते. घरासमोर शेण केल्यास उचलणार कोण? या विचारातून हाकलले जाते. मात्र, होळीला याच शेणाचा शोध घेण्यास सुरुवात करतात. कारण, होळी पेटवताना मोठ्याप्रमाणात गोवऱ्यांची गरज भासत असते. अशावेळी त्यांना शेणाचे महत्त्व लक्षात येते. 

Image may contain: food

शहरातही मोठ्या प्रमाणात गोठे आहेत. येथे शेण साचलेले असते. काहीजण यापासून गोबरगॅसची निर्मिती करतात. मात्र, त्यानंतरच्या टाकाऊ पदार्थाची समस्या कायमच असते. शहरातील एका चोवीस वर्षीय मुलाने या टाकाऊ पदार्थापासून दगडी कोळशाची निर्मिती केली आहे. विशेष म्हणजे या संशोधनामुळे देवलापार येथील गो-विज्ञान अनुसंधान केंद्रातील मोठी समस्या सुटणार आहे. 

No photo description available.

खामला भागात राहण्याच्या अंकित पाटीलने सोमलवार विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केले. पुढे पलोटी अभियांत्रिकीत शिक्षण घेऊन रशिया गाठले. येथील सेंट पीटबर्ग पॉलिटेक्‍निक युनिव्हर्सिटीतून इन्स्टिट्यूट ऑफ एनर्जी ऍण्ड ट्रान्स्पोर्ट सिस्टीम या विभागातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून अंकित घरी परतला आहे. "बायोगॅस' क्षेत्रात संशोधन करीत असल्याने अंकितला देवलापार येथील गो-विज्ञान अनुसंधान केंद्रातील समस्येचे निराकरण करण्यासाठी बोलावण्यात आले. अन्‌ त्याच्या संशोधनाला खऱ्या अर्थाने नवी दिशा मिळाली. 

Image may contain: one or more people and people sitting
गोबरगॅसपासून टायरट्यूब फुगवताना अंकित पाटील

देवलापार केंद्रातील शेण गोबरगॅससाठी वापरले जाते. त्यानंतर उरणारा टाकाऊ पदार्थ खत म्हणून शेतात अन्‌ त्याचे गोळे चुलीसाठी वापरण्यात येतात. मात्र, या गोळ्यांची योग्य विल्हेवाट लावता येईल का असा प्रश्‍न अंकितला विचारण्यात आला. याच गोळ्यांपासून अंकितने दगडी कोळशाचा पर्याय शोधून काढला. विशेष म्हणजे यात धातूजन्य पदार्थ आढळून आले आहे. त्यामुळे हे गोळे छोट्या उद्योगांच्या भट्टीसाठी उपयोगात येऊ शकतात. यातून शेतकऱ्यांना उत्पन्न प्राप्त होऊ शकते, असा विश्‍वास अंकितने व्यक्‍त केला आहे. 

शेणातच "दम'

बायोगॅसची निर्मिती भाज्या-खाद्यान्न व सांडपाण्यापासून होते. मात्र, त्याच्या टाकाऊ पदार्थाच्या गोळ्यांपासून दगडी कोळशाचा पर्याय निर्माण होणे शक्‍य नसल्याचे अंकितने सांगितले. शेणातच तो "दम' असल्याने गोबरगॅस प्रकल्पातून निघणारा पदार्थच यासाठी उपयोगात येणार आहे. 

Image may contain: 1 person, standing

गोठा तेथे गोबरगॅस प्रकल्प 
शेणाचा पर्याय गाई पाळणाऱ्याला शोधावाच लागलो. अनेक उत्साही लोक कमी जागेत गोबरगॅसची निर्मिती करतात. मात्र, त्यातून निघणाऱ्या टाकाऊ पदर्थाचे काय करायचे हा प्रश्‍न प्रत्येकाला पडतो. मात्र, या संशोधनामुळे उत्पन्नाचा नवीन मार्ग शक्‍य असल्याने प्रत्येक गोठ्यात गॉबरगॅसची सोय असायलाच हवी. 
- अंकित पाटील

क्लिक करा - पाडलं की हो! डॉन आंबेकरच्या चारमजली आलिशान बंगल्यावर बुलडोझर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coal from waste material