दिवाळीत नारळाच्या विक्रीने गाठला उच्चांक 

संदीप गौरखेडे
गुरुवार, 31 ऑक्टोबर 2019

कोदामेंढी (जि.नागपूर) : पूजापाठात नारळाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. खूप काळ टिकणारे नारळ हे फळ आरोग्यवर्धक समजल्या जात असून पूजापाठ, हवन, नवस फेडणे याकरिता अधिक प्रमाणात वापरले जाते. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा दिवाळीला नारळाची विक्री मोठ्या प्रमाणात झाली असून कोदामेंढी आणि परिसरात नारळाचा तुटवडादेखील जाणवू लागल्याचे विक्रेत्यांकडून ऐकायला मिळाले. 

कोदामेंढी (जि.नागपूर) : पूजापाठात नारळाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. खूप काळ टिकणारे नारळ हे फळ आरोग्यवर्धक समजल्या जात असून पूजापाठ, हवन, नवस फेडणे याकरिता अधिक प्रमाणात वापरले जाते. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा दिवाळीला नारळाची विक्री मोठ्या प्रमाणात झाली असून कोदामेंढी आणि परिसरात नारळाचा तुटवडादेखील जाणवू लागल्याचे विक्रेत्यांकडून ऐकायला मिळाले. 
नागपंचमी, गणपती उत्सव, नारळी पौर्णिमा, दिवाळी, भाऊबीज आणि इतर बऱ्यांच उत्सवात नारळाची मागणी मोठ्या प्रमाणात असते. यंदा दिवाळीत फक्त कोदामेंढीत 10 हजारांवर नारळाची विक्री झाल्याचे किराणा दुकानदार दिनेश देवतळे यांनी सांगितले. पाच दिवसांत त्यांच्या स्वतःच्या दुकानातून अडीज हजार नारळाची विक्री झाली आहे. गावात दोन दिवस नारळाचा तुटवडा भासला. दिवाळी आणि भाऊबीज असल्याने नारळाची मागणी आहे. दिवाळी सणामुळे नागपूरची बाजारपेठ आणि ट्रान्सपोर्ट बंद असल्याने नारळाचा तुटवडा जाणवला. मागील वर्षापेक्षा यावर्षी नारळाच्या विक्रीत जवळपास पाच हजार प्रतीने वाढ झाल्याचे एकाने सांगितले. नारळाचा तुटवडा जाणवू लागल्याने 20 रुपये विक्रीचे नारळ पंचवीस रुपयांना बऱ्यांच दुकानदारांनी विक्री केली, अशी स्थिती ग्रामीण भागात अनेक ठिकाणी दिसून आली. दिवाळीत पूजेकरिता नारळ ठेवले जात असून प्रसाद म्हणून वाटला जातो. भाऊबीजेला बहीण भावाला ओवाळणी घालीत असल्याने भेटवस्तू बरोबर नारळ देत असतात. त्यामुळे या "सिझन'मध्ये नारळाची खूप मोठ्या प्रमाणात विक्री होत असते. हिंदू संस्कृतीत वर्षभरात अनेक सण, उत्सव होत असतात. त्यामानाने यावर्षी दिवाळी आणि भाऊबीजेला नारळाची मागणी आणि त्याच्या विक्रीत होणारी वाढ बघता अनेकांनी आश्‍चर्य व्यक्‍त केले. 
श्रीफळाचे महत्त्व 
नारळाचे शास्त्रीय नाव "कोकोस नूसीफेरा' असून विषुववृत्तीय उष्णकटिबंधीय प्रदेशात मुख्यत्वे समुद्रकिनारी लगतच्या भागात "ताड' कुळातील हा एक वृक्ष आहे. ओले आणि सुखे नारळ, असे दोन प्रकारचे असून ओले नारळ आरोग्यासाठी गुणवर्धक आहेत. नारळाचे खूप महत्त्व असून तशी त्याची मागणीदेखील आहे. महाराष्ट्रात नारळ ओडिशा, केरळ राज्यातून पुरविल्या जातो. नारळ खाण्यास रुचकर आणि चवदार असल्याने त्याचा वापर गृहिणी स्वयंपाकघरात नेहमीच वापरत असतात. सत्कार समारोहाच्या कार्यक्रमातदेखील नारळ देऊन अतिथींचा सन्मान केला जातो. दिवसेंदिवस नारळाची मागणी आणि महत्त्व बघता त्याच्या किमतीदेखील तशाच वाढताना दिसून येत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coconut sales hit a high in Diwali