आजपासूनच करा पाण्याची बचत - तज्ज्ञांचे आवाहन 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 मार्च 2018

अमरावती सकाळ च्या कार्यालयात पाणीबचत या विषयावर चर्चासत्र पार पडले.

अमरावती - सकाळ कार्यालयात आयोजित 'कॉफी विथ सकाळ' या कार्यक्रमात पाणीबचतीचा सल्ला तज्ज्ञांनी दिला. 

पाणीवापरावर बंधन घालणे अशक्‍य असले, तरी बचत व पुनर्भरणाची सवय प्रत्येकाने स्वतःपासूनच प्रारंभ केल्यास पाणी वाया जाणार नाही. भूगर्भातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे, त्यामुळे पाणीबचत ही काळाची गरज बनली आहे. सध्या आपण अलार्मिंग स्टेजवर असून आजच दखल न घेतली गेली, तर उद्या पाण्यासाठी त्राही त्राही होण्याची शक्‍यता नाकारता येणार नाही, असा निष्कर्ष 'कॉफी विथ सकाळ' उपक्रमांतर्गत पाणीबचत विषयावर आयोजित चर्चेतून तज्ज्ञांनी काढला. 

Web Title: coffee with sakal organised in sakal amravati office