विदर्भ गारठला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जानेवारी 2017

नागपूर - दोन-तीन दिवसांपासून उन्हाने घामाघूम झालेल्या नागपूरकरांना मंगळवारी अंगाला झोंबणाऱ्या गारठायुक्‍त वाऱ्यांचा सामना करावा लागला. दिवसभर थंडगार वारे वाहिल्याने नागरिकांना स्वेटर घालूनच दैनंदिन कामे करावी लागली. हवेतील गारठा आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्‍यता प्रादेशिक हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आली आहे.

गेल्या आठवड्यात या मोसमातील 7.7 अंश सेल्सिअसचा नीचांक नोंदविल्यानंतर मधल्या काळात थंडी अचानक गायब झाली होती. परिणामत: पारा 13 अंशांपर्यंत चढला होता. पंखेही वेगाने फिरत होते. मात्र, मंगळवारी वातावरणात अचानक बदल झाला. सकाळपासूनच गारठायुक्‍त बोचरे वारे वाहात होते. भरदुपारीही थंडी जाणवली.

सायंकाळच्या सुमारास थंडीचा प्रभाव आणखीणच तीव्रतेने जाणवला. गारठ्यामुळे पारा पुन्हा घसरू लागला आहे. विदर्भातील बहुतांश शहरांमध्ये किमान तापमान 10 ते 12 अंशांदरम्यान नोंदले गेले. मध्य प्रदेश व उत्तर प्रदेशसह मध्य भारतात "विंड सर्क्‍यूलेशन' निर्माण झाल्यामुळे विदर्भात थंडीचे आगमन झाले असून, आणखी दोन-तीन दिवस बोचरे वारे वाहणार असल्याचे संकेत हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले.

Web Title: cold in vidarbha