विदर्भात थंडीची लाट कायम

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जानेवारी 2017

नागपूर - विदर्भातील थंडीची लाट कायम आहे. गोंदिया येथे रविवारीही विदर्भात नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली. उपराजधानीतील पाऱ्यात किंचित वाढ झाली असली, तरी बोचरे वारे व गारठ्याने नागपूरकर दिवसभर त्रस्त होते. 

उत्तर भारतातील काश्‍मीरसह अनेक पहाडी भागांमध्ये सुरू असलेल्या बर्फवृष्टीमुळे विदर्भात सध्या शीतलहर पसरली आहे. गेल्या शुक्रवारी पारा या मोसमात प्रथमच 7.2 अंशांपर्यंत घसरला होता. रविवारी किमान तापमान किंचित चढून 10.3 अंशांवर स्थिरावले. मात्र, त्यानंतरही थंडी कमी झाली नाही. विदर्भात थंडीच्या लाटेचा सर्वाधिक प्रभाव गोंदिया येथे दिसून येत आहे. येथे रविवारीही किमान तापमान विदर्भात सर्वांत कमी (7.1 अंश सेल्सिअस) नोंदले गेले. याशिवाय वाशीम (9.2 अंश सेल्सिअस) आणि ब्रह्मपुरी (10.9 अंश सेल्सिअस) येथेही थंडीचा तीव्र प्रभाव दिसून आला. थंडी आणखी काही दिवस कायम राहणार आहे. त्यानंतर हळूहळू तापमानात वाढ होण्याची शक्‍यता आहे. 

Web Title: Cold wave continues in Vidarbha