जिल्हाधिकारी मुद्‌गल म्हणाले, हैं तैयार हम

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 सप्टेंबर 2019

नागपूर : विधानसभा निवडणुकीसाठी आज आचारसंहिता लागू झाली. नागपूर जिल्ह्यातील 12 जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्‌गल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

नागपूर : विधानसभा निवडणुकीसाठी आज आचारसंहिता लागू झाली. नागपूर जिल्ह्यातील 12 जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्‌गल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हाधिकारी मुद्‌गल यांनी सांगितले की, निवडणुकीसाठी विधानसभानिहाय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याकरिता 21 हजार 970 कर्मचऱ्यांची आवश्‍यक असून 4,382 कर्मचाऱ्यांची अतिरिक्त नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. दक्षता पथकही तयार करण्यात आली आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात चार दक्षतापथक नियुक्त करण्यात येणार असून, प्रत्येक पथकात चार ते पाच कर्मचाऱ्यांचा समावेश राहील. तसेच कॅमेरा आणि सांख्यिकी पथकसुद्धा असेल. मध्य प्रदेशातील दोन जिल्हे लागून आहे. या जिल्ह्यातून कोणत्याही प्रकारची तस्करी होता कामा नये, यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, पोलिस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा उपनिवडणूक अधिकारी राजलक्ष्मी शहा, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी, शिरीष पांडे आदी उपस्थित होते.
55 संवेदनशील मतदान केंद्र
निवडणुकीसाठी 4,412 मतदान केंद्र निश्‍चित करण्यात आले असून यातील 55 केंद्र संवेदनशील आहे. या संवेदनशील मतदार केंद्रावरून सीसीटीव्ही लावण्यात येणार असून अतिरिक्त सुरक्षा देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे वेब कास्टिंग करण्यात येणार आहे. लोकसभेच्या तुलनेत 30 मतदान केंद्र अधिक आहेत. एका विधानसभा संघात एक केंद्र विशेष महिलांचे असणार आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: collector mudgal, election