पुनर्प्रक्रियेने वाढविली डोकेदुखी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जून 2019

नागपूर : उच्च व तंत्रशिक्षण संचालनालयाने अभियांत्रिकी शाखेसाठी नव्याने प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. पुनर्प्रक्रियेने इच्छुक विद्यार्थ्यांची आणि पालकांची डोकेदुखी चांगलीच वाढविली आहे. प्रवेश आवश्‍यक असल्याने बाहेरगावी गेलेल्या विद्यार्थ्यांना मध्येच सर्व कार्यक्रम रद्द करून स्वगृही परतावे लागले आहे.

अभियांत्रिकी प्रवेशासाठी यापूर्वीच नोंदणी करण्यात आली होती. परंतु, जुनी नोंदणी रद्द करून सोमवारपासून नव्याने प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. नव्याने ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी विद्यार्थ्यांना धावपळ करावी लागत आहे. ऑनलाईन नोंदणीनंतर सुविधा केंद्रांवर जाऊन गुणपत्रिकेसह संबंधित कागदपत्रांची पडताळणीही करून घ्यायची आहे. यामुळे सुविधा केंद्रांवरही विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली आहे. बुधवारपासून ही गर्दी अधिकच वाढणार आहे. कागदपत्रांची सत्यता तपासतानाच विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्रसुद्धा सादर करायचे आहे. ते नसणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
20 जूनपूर्वी नोंदणी आणि कागदपत्रांची सत्यता पडताळणी करून घेणारे अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या कारणांनी बाहेरगावी निघून गेले होते. त्यांना धावपळ करीत परतावे लागले आहे. नवीन वेळापत्रकानुसार नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 2 जुलैला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट पोर्टलवर अपलोड केली जाणार आहे. त्यानंतर 3 व 4 जुलैला सुविधा केंद्रांवर आक्षेप नोंदवून घेतले जातील. 5 जुलैला अंतिम मेरिट लिस्ट अपलोड होईल आणि त्यानंतर प्रवेशप्रक्रिया प्रारंभ होईल.
20 जूनला सीईअी सेलचे पोर्टल ठप्प झाल्यानंतर अभियांत्रिकीसह अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया ठप्प झाली होती. त्यानंतर नव्याने संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली जात आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: college admmsion news