महाविद्यालयीन विद्यार्थ्याची गळफास लावून आत्महत्या

महाविद्यालयीन विद्यार्थ्याची गळफास लावून आत्महत्या

खापरखेडा - स्थानिक पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने मोहल्ल्यात भांडण झाल्याच्या कारणावरून घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.

प्राप्त माहितीनुसार अमन संजय वानखेडे (वय१८,वॉर्ड क्रमांक २, रेल्वे चौकी खापरखेडा) असे मृताचे नाव आहे. अमन हा कोरडीच्या सरस्वती महाविद्यालयात बाराव्या वर्गात शिकत होता. अमन आपल्या आई व बहिणीसोबत रवी पिंपळकर यांच्या घरी किरायाने राहत होता. अमनची  आई नागपूरच्या एका खासगी रुग्णालयात परिचारिका असून बहीण शिकत आहे.

रविवारी रात्रीच्या सुमारास अमन राहत असलेल्या मोहल्ल्यात काही तरुणांसोबत भांडण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. सोमवारी सकाळी अमनची आई नेहमीप्रमाणे रुग्णालयात व बहीण शाळेत गेली. नेमकी हीच संधी साधून त्याने राहत्या घरी सिलिंगला ओढणी बांधून गळफास लावून आत्महत्या केली. सकाळी ११.४५ च्या सुमारास अमनची बहीण शाळेतून घरी परतल्यावर अमन गळफास लावलेल्या अवस्थेत दिसला. यावेळी तिने आरडाओरडा केला असता शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. 

लागलीच खापरखेडा पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून शवविच्छेदनाकरिता अमनचे पार्थिव शासकीय रुग्णालयात हलविले. पोलिसांना घटनास्थळावर एक चिठ्ठी आढळून आल्याची माहिती मिळाली असून ती मराठीत लिहिली आहे. मात्र, अमन नेहमी इंग्रजी भाषेचा वापर करीत असायचा. त्यामुळे शंकेला पेव फुटले आहे. खापरखेडा पोलिसांनी यासंदर्भात अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com