महाविद्यालयांत "ऍन्टी रॅगिंग सेल' होईना!

file photo
file photo

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांनी ऍन्टी रॅगिंग सेलला मूठमाती दिल्याचे समजते. विशेष म्हणजे दरवर्षी विद्यापीठ अनुदान आयोगाकडून महाविद्यालयात ऍन्टी रॅगिंग सेलची स्थापना करण्याचे पत्र दिले जाते. गेल्या अकरा वर्षांत केवळ 60 महाविद्यालयांकडून या सेलची स्थापना करण्यात आली. याउलट विद्यापीठाच्या ऍन्टी रॅगिंग सेलला दहा वर्षांत आठ तक्रारी मिळाल्या आहेत. त्यामुळे महाविद्यालयांकडून अनुदान आयोगाच्या पत्राला केराची टोपली दाखविल्याचे दिसून येते.
सर्वोच्च न्यायालयांच्या निर्देशनुसार प्रत्येक विद्यापीठात "ऍन्टी रॅगिंग मॉनिटरी सेल' स्थापन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार विद्यापीठाने 18 ऑगस्ट 2009 रोजी विद्यार्थी कल्याण संचालकांच्या देखरेखीखाली "ऍन्टी रॅगिंग मॉनिटरी सेल'ची स्थापना केली. सेलमध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य, अधिष्ठाता, विधीसभा सदस्य, विद्यार्थी कल्याण संचालकांचा समावेश होता. या सेलद्वारे विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयांना दरषर्वी पत्र पाठवून "रॅगिंग'विरोधात सेल स्थापन करण्याचे आवाहन केले होते. शिवाय विद्यार्थ्यांनाही थेट तक्रारी करण्याचे आवाहन करण्यात आले. गेल्या अकरा वर्षांपासून महाविद्यालयात सातत्याने रॅगिंगचे प्रकार घडत असताना, महाविद्यालयांतील प्राचार्यांनी कमालीची चुप्पी साधली आहे. विद्यापीठाकडे दहा वर्षांत आठच तक्रारी आल्या. भगवती अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांची रॅगिंग घेऊन अमानुष वागणूक दिल्याचा प्रकार उघडकीस आला. यानंतरही वर्षभरात शहरातील अनेक अभियांत्रिकी महाविद्यालयात असे प्रकार घडत असताना, त्याकडे महाविद्यालय प्रशासन कानाडोळा करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे ज्युनिअर विद्यार्थ्यांना मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागतोय, हे विशेष.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com