वेकोलिच्या अधिकाऱ्यावर कोलमाफियांचा हल्ला

पारशिवनी ः हल्लेखोरांनी तोडफोड केलेली कार.
पारशिवनी ः हल्लेखोरांनी तोडफोड केलेली कार.

पारशिवनी : शिंगोरी येथील वेकोलिच्या कार्यालयावर अंदाजे 35 कोलमाफियांनी अचानक हल्ला करून एका अधिकाऱ्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना गुरुवारी (ता. 31) सकाळी घडली. गुंडांनी कार्यालय व वाहनांची तोडफोड केल्यानंतर कर्मचाऱ्यांना मारहाण केली. हल्ल्यातील आठ आरोपींना पोलिसांनी अटक केली.
शिंगोरी भागात कोल इंडियाची खाण आहे. आज सकाळी कंपनीच्या वेस्टर्न शेडमध्ये काही लोक कोळसा जमा करीत असल्याने त्यांना मनाई करण्यात आली. या बाबतीत पारशिवनी पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. त्यानंतर अचानक 35 हल्लेखोरांनी कंपनीच्या शिंगोरी येथील कार्यालयावर शस्त्रे, लाठ्या-काठ्या घेऊन हल्ला चढवला. त्यात कंपनीचे माइन मॅनेजर राजेंद्र ठाकरे जखमी झाले. त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. कार्यालय व कंपनीच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली. कार्यालयात नासधूस केल्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला.
या घटनेची माहिती वेकोलिच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळताच एरिया मॅनेजर गेडाम, सब एरिया मॅनेजर देवेंद्र प्रसाद, भानेगाव येथील मॅनेजर कुमेरिया व शेकडो कर्मचाऱ्यांनी पारशिवनी पोलिसांत तक्रार दाखल करून आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली. तक्रार दाखल होताच पारशिवनीचे पोलिस निरीक्षक दीपक वंजारी सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. गुन्हा नोंदवून पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. आरोपींपैकी आठ आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले.
अवैध धंद्यांना ऊत
मागील काही दिवसांपासून पारशिवनी तालुक्‍यात अनेक अवैध धंद्यांना ऊत आला आहे. काही दिवसांपूर्वी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वाळू तस्करी प्रकरणात स्वतः कारवाई केल्याची घटना ताजी आहे. तरीही अवैध धंद्यांना आळा बसला नाही. अशा मारहाणीच्या घटना या नित्याच्याच घडत असतात. त्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. प्रशासनाने वेळीच कडक कारवाई करणे गरजेचे झाले असल्याची प्रतिक्रिया व्यक्‍त करण्यात येत आहे.

वेकोलि अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची तक्रार दाखल झाली आहे. या हल्लेखोरांविरोधात कडक कारवाई करण्यात येईल.
- दीपक वंजारी, पोलिस निरीक्षक, पारशिवनी पोलिस ठाणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com