'ती' बहिणीच्या बाळंतपणासाठी आली आणि गर्भवती झाली 

अनिल कांबळे
गुरुवार, 10 मे 2018

नागपूर : बहिणीच्या बाळंतपणासाठी आलेल्या युवतीवर बहिणीच्या दिराने बलात्कार केला. त्यातून तिला गर्भधारणा झाली. या प्रकरणी युवतीच्या तक्रारीवरून बहिणीच्या दिराविरूद्ध कोराडी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. 

खसाळा गावात राहणाऱ्या 17 वर्षीय मुलीच्या मोठ्या बहिणीचे कोराडीत राहणाऱ्या एका दुध विक्रेत्या युवकाशी लग्न झाले. बहिणीच्या बाळंतपणासाठी ती बहिणीच्या घरी आली. बहिणीचा 25 वर्षीय दिर चंचलेश हा सुद्धा भावासोबत दुधविक्रीचे काम करतो. दरम्यान घरी ती आल्यानंतर गमती-जमतीतून दोघांचे सूत जुळले. भाऊ आणि वहिनी दवाखान्यात असताना दोघांची जवळीक वाढली. दोघांची मने जुळली.

ऑगस्ट 2017 मध्ये दोघांनी चंचलेशने लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध निर्माण केले. तेव्हापासून घरी कोणी नसताना अनेक वेळा चंचलने तिच्याशी वारंवार लैंगिक संबंध प्रस्थापित केले. त्यातून ती गर्भवती झाली. तिने पोटात दुखत असल्याची तक्रार बहिणीकडे केली. त्यामुळे तिला डॉक्‍टरांकडे नेले. डॉक्‍टरांनी चार महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितले. बहिणीला धक्‍का बसला. तिने आईवडीलांना फोन करून माहिती दिली. त्यानंतर नातेवाईकांनी बैठक बोलावली आणि लग्नाबाबत विचारणा केली. मात्र, चंचलेशने लग्नास थेट नकार दिला. त्यानंतर मुलीने कोराडी पोलिस ठाण्यात पोहचून तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. 

Web Title: come to take care of sister and got pregnant herself