"माझं काय चुकलं?'वरून प्रेक्षकांत कॉमेंट्‌स! 

सतीश तुळसकर
बुधवार, 30 ऑक्टोबर 2019

उमरेड(जि.नागपूर):  विधानसभेच्या निवडणुकीनंतर निकालही लागला. दिवाळीच्या तोंडावर निवडणूक आल्यामुळे कोणी कुणाला फटाके बांधले, तर कोणी विजयाचे फटाके फोडले. मात्र आता निवडणुकीचा धुरळा शांत झाल्यानंतर मंगळवारी (ता. 30) नवनिर्वाचित आमदार राजू पारवेंच्या हस्ते "माझं काय चुकलं?' या नाटकाचे उद्‌घाटन झाले. "राजूभाऊ, तुमचं काहीच चुकलं नाही', अशा कॉमेंट्‌स नाटकाच्या शीर्षकावरून प्रेक्षकांत ऐकायला मिळत होत्या. 

मंगळवारी (ता. 30) भिवापूर तालुक्‍यातील सालेभट्टी (पुनर्वसन) येथे भाऊबिजेनिमित्त नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. "माझं काय चुकलं?' या नाट्यप्रयोगाचे उद्‌घाटन नवनिर्वाचित आमदार राजू पारवे यांच्या हस्ते करण्यात आले. उद्‌घाटनाप्रसंगी मंडळाच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांतर्फे नवनिर्वाचित आमदार राजू पारवे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भरघोस मतांनी निवडून दिल्याबद्दल सर्व जनतेचे आमदारांनी आभार मानले तसेच दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. आमदार होण्यापूर्वीही राजू पारवे यांनी अनेक कार्यक्रमांतून सामाजिक बांधीलकी जोपासत उपस्थिती लावली होती. "राजूभाऊ, तुमचं काहीच चुकलं नाही, चुकलं असेल तर सुधीरभाऊचंच ! आगे बढो!' असे म्हणत कार्यकर्त्यांनी आमदार राजू पारवे यांची पाठराखण केली. सालेभट्टी (पुनर्वसन) बांधवांसोबत जिव्हाळ्याचे संबंध असून या भागातील प्रश्न मला अवगत आहेत. येणाऱ्या काळात सर्व प्रश्न सभागृहात मांडण्याचा प्राथमिक प्रयत्न राहील. येणाऱ्या काळात तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करेन, असा विश्‍वास आमदार राजू पारवेंनी दिला. उमरेड विधानसभा क्षेत्रातून विजयी होताच राजू पारवे यांनी आमदार म्हणून मिळणारे मानधन संकटग्रस्तांच्या सेवेसाठी देणार असल्याचे जाहीर केले. कार्यक्रमाला आनंदराव राऊत, सोपान दळवे, वसंतराव ढोणे, कृष्णाजी घोडेस्वार, संजू नाईक, धर्मेंद्र देशमुख, हनीफ शेख, गजानन तितरमारे, रामाजी उके, रमेश भजभुजे, मनूजी घोडेस्वार, देवेंद्र देशमुख, सुरेश देशमुख, नत्थूजी उरकुडे, ओमप्रकाश वाकडे, शुभम डांगरे, उत्तम रडके, शांताराम रडके, ताराचंद भोयर व मंडळाचे पदाधिकारी व हजारोंच्या संख्येने नाट्यप्रेमी उपस्थित होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Comments from the audience: "What did I miss?"