वाणिज्य, विज्ञानचे प्रवेश फुल्ल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 जून 2016

वाढीव जागांसाठी महाविद्यालय देणार प्रस्ताव
नागपूर - बारावीचा निकाल घोषित झाल्यानंतर प्रथम वर्षाच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली. दोन आठवड्यात शहरातील नामवंत महाविद्यालयात वाणिज्य आणि विज्ञान अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाचे प्रवेश "फुल्ल‘ झालेत. त्यामुळे नव्या वाढीव जागांसाठी महाविद्यालये विद्यापीठाच्या महाविद्यालय आणि विकास विभागाकडे अर्ज सादर करणार असल्याचे समजते.

वाढीव जागांसाठी महाविद्यालय देणार प्रस्ताव
नागपूर - बारावीचा निकाल घोषित झाल्यानंतर प्रथम वर्षाच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली. दोन आठवड्यात शहरातील नामवंत महाविद्यालयात वाणिज्य आणि विज्ञान अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाचे प्रवेश "फुल्ल‘ झालेत. त्यामुळे नव्या वाढीव जागांसाठी महाविद्यालये विद्यापीठाच्या महाविद्यालय आणि विकास विभागाकडे अर्ज सादर करणार असल्याचे समजते.

राज्यात 25 मे रोजी बारावीच्या निकालाची घोषणा झाली. विभागातून यामध्ये एक लाख 55 हजार नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी एक लाख 55 हजार 728 विद्यार्थी प्रविष्ठ झाले. या विद्यार्थ्यांपैकी 1 लाख 34 हजार 473 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. यावर्षी बारावीच्या निकालात 5.76 टक्‍क्‍याने घट झाली. कला शाखेत ही घट 8 टक्‍क्‍याने तर वाणिज्य आणि विज्ञान शाखेचा निकाल केवळ एक ते तीन टक्‍क्‍यानेच घट झाली. तीन जूनला गुणपत्रिकेचे वाटप होताच, बीएसस्सी, बी.कॉम, बीएसहित इतर अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्यास सुरुवात केली. या पंचविसात गतवर्षीप्रमाणेच वाणिज्य आणि विज्ञानला विद्यार्थ्यांनी प्रथम पसंती दर्शविली आहे. शहरातील जवळपास सर्वच महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या प्रथम वर्षाचे प्रवेश जवळपास संपलेले आहेत. हीच स्थिती परिस्थिती वाणिज्य शाखेची आहे. कला शाखा यामध्ये माघारली असली तरी, यावर्षी या शाखेतही बऱ्यापैकी प्रवेश झाले आहेत. त्यामुळे बरेच विद्यार्थी अद्याप प्रवेशासाठी वंचित आहेत. ही परिस्थिती लक्षात घेता, महाविद्यालयांकडून पंचवीस टक्के वाढीव जागा देण्यासाठी प्रस्ताव टाकण्यात येणार आहे. पुढल्या आठवड्यात ते प्रस्ताव विद्यापीठाकडे सादर होतील.

राज्यातील शाखानिहाय निकाल
विज्ञान - 94.59 - 57 हजार 970,
कला - 78.16 - 50 हजार 735
वाणिज्य - 88.96 -18 हजार 956
एमसीव्हीसी - 82.35 - 6 हजार 812

शाखानिहाय जागा विद्यापीठातील जागा (अंदाजित)

-कला - 60 हजार.
-वाणिज्य - 26 हजार.
-विज्ञान - 20 हजार.
-गृहविज्ञान - 1 हजार 600.
-बीबीए - 25 हजार.
-बीसीए - 16 हजार.
-बीएसई आयटी - 1 हजार 700.

गतवर्षीप्रमाणेच यावर्षीही वाणिज्य आणि विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेण्यास विद्यार्थ्यांच्या रांगा लागल्या आहेत. आता प्रवेश संपल्याने वाढीव जागांसाठी बीसीयूडीकडे पुढल्या आठवड्यात तसा प्रस्ताव देणार आहे.
- डॉ. बबनराव तायवाडे, प्राचार्य, धनवटे नॅशनल कॉलेज

Web Title: commerce and science admission are full in nagpur