आयुक्त अभिजित बांगर यांचा महावितरणला कारवाईचा इशारा 

file photo
file photo

नागपूर : महावितरणतर्फे शहरात विविध ठिकाणी कामे सुरू आहे. यासाठी रस्त्यांवर खड्डे खोदले आहेत. परंतु, काम करताना त्यांचा निष्काळजीपणा दिसून येत असल्याचे नमुद करीत आयुक्त अभिजित बांगर यांनी नाराजी व्यक्त केली. कामे व्यवस्थित न केल्यास कारवाईचा इशाराही त्यांनी दिला. सात दिवसांत शहरातील खड्डे बुजविण्याचे आदेश दिल्यानंतरही समाधानकारक प्रगती नसल्याने आयुक्तांनी कामात निष्काळजीपणा करणाऱ्या कंत्राटदारांवर व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश सर्व विभागांना दिले. 
शासकीय यंत्रणेसंदर्भातील खड्डे दुरुस्ती संदर्भात समन्वयन समिती गठित केली असून, समितीची दुसरी बैठक आयुक्त अभिजित बांगर यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी मनपात पार पडली. महावितरणने टेलीफोन एक्‍सचेंज चौकात केलेल्या कामात मोठ्या प्रमाणावर त्रुटी आढळल्या होत्या. यानंतर असा प्रकार घडला तर कामे रद्द करण्यात येईल, अशी तंबी आयुक्तांनी दिली. बांधकाम करताना कुठेही बॅरीगेट्‌स नाही. सूचना फलकेही लावले नसल्याचे आढळल्याचे त्यांनी सांगितले. मुदत संपल्यांनतरही कामे सुरू असतील तर आधी मनपाची परवानगी घ्यावी, नंतर काम सुरू करण्याचे निर्देश त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले. सर्व शासकीय यंत्रणेच्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्वतः रस्त्यावर फिरून कुठे खड्डे दिसून येत असेल तर संबंधित अधिकाऱ्यांना अवगत करावे. यासंबंधी आता हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणा चालणार नाही, असे निर्देश आयुक्तांनी दिले. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार रस्ता जर वापरण्यायोग्य नसेल आणि त्यावर जर अपघात झाला तर संबंधित कंत्राटदारावर फौजदारी गुन्हा नोंदविला जाणार आहे. जर कंत्राटदारावर गुन्हा नोंदविला नाही तर संबंधित अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्‍चित करून त्यांच्यावर गुन्हा नोंदविला जाणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com