प्रवाशाच्या नातेवाइकांना नुकसानभरपाई द्या

file photo
file photo

नागपूर : रेल्वे अपघातामध्ये मृत पावलेल्या प्रवाशाच्या कुटुंबाला आठ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रेल्वे विभागाला दिले. विशेष म्हणजे, मध्य रेल्वेच्या न्यायालयात झालेल्या सुनावणीत रेल्वे विभागाने हा अपघात नसून आत्महत्या असल्याचे सिद्ध केले होते. हा आदेश रद्द करीत नुकसानभरपाई नऊ टक्के व्याजासह देण्याचे आदेश दिले.
गोंदिया येथे डाकघर कार्यालयामध्ये कार्यरत असणारे वसंत नंदगवळे (57) हे गोंदियावरून रेल्वेने कुटुंबीयांसह नागपूरला येण्यासाठी 5 मे 2013 रोजी निघाले. इतवारी स्टेशन दरम्यान रेल्वेची गती कमी झाल्यानंतर ते धक्‍क्‍याने रेल्वेच्या बाहेर फेकले गेले. यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. नातेवाइकांनी रेल्वेकडून नुकसानभरपाई मिळावी म्हणून रेल्वे प्रशासनाला रीतसर अर्ज केला होता. मात्र, हा अपघात नसून नंदगवळे यांनी रेल्वेतून उडी मारून आत्महत्या केल्याचे रेल्वे विभागाने सुनावणीत सिद्ध केले होते.
रेल्वे न्यायालयाने दिलेल्या आदेशात नुकसानभरपाई नाकारली होती. या निर्णयाविरोधात प्रवाशाच्या नातेवाइकांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली. ऍड. एस. के. साबळे यांच्यामार्फत याचिका दाखल केली. वसंत नंदगवळे यांनी मृत्यूपूर्वी "मी रेल्वेमध्ये उभा होतो आणि धक्‍क्‍याने रेल्वेबाहेर पडलो. मी आत्महत्या केली नाही' असे बयानामध्ये लिहून दिले होते. याचा आधार घेत उच्च न्यायालयाने रेल्वे प्रशासनाला नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले. न्यायमूर्ती मुरलीधर गिरटकर यांनी हे आदेश दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com