अंकुर कंपनीविरोधात पोलिसांत तक्रार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 जुलै 2019

चिमूर (जि. चंद्रपूर) : अंकुर कंपनीच्या प्रभाकर या सोयाबीन वाणाची तालुक्‍यातील अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र, हे वाण उगवले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी अंकुर कंपनीविरोधात शेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणानंतरही कृषी विभागाने दुर्लक्ष केल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

मनसे उपजिल्हाप्रमुख प्रशांत कोल्हे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकारी, तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी अंकुर कंपनीविरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर कृषी विभागाकडून तालुक्‍यातील 29 शेतकऱ्यांच्या शेतात चौकशी केली. केवळ चौकशीचा फार्स करणाऱ्या कृषी विभागाविरोधात शेतकऱ्यांमद्ये संताप व्यक्त केला जात आहे.
कृषीकेंद्र संचालकांकडून सावरासावर
उगवण क्षमता नसलेल्या अंकुर कंपनीच्या प्रभाकर वाणाच्या सोयाबीन बियाणांची कृषी केंद्र संचालकांनी मोठ्या प्रमाणात विक्री केली. मात्र, आता हे वाण उगवले नाही. कृषी केंद्र संचालकांकडून नवीन बियाणे देऊन सावरासावर केली जात आहे.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Complaint against police in Ankur Company