शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

काटोल (जि. नागपूर) :  काटोल-नरखेड तालुक्‍यामध्ये निसर्गाच्या लहरीपणामुळे व सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणामुळे शेतकरी हतबल झाला असून त्याच्यासमोर जगावे की मरावे असा प्रश्न निर्माण झाला आहे, म्हणूनच शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करा या मुख्य मागणीचे निवेदन विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने काटोलच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले.

शेतकरी नेते सुनील वडस्कर यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनातून सरकारने शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याची घोषणा केली होती. मात्र, उत्पादन खर्च कमी करून त्याच्या दीडपट हमीभाव जाहीर केल्याने, शेतकऱ्याची फसवणूक करण्यात आली आहे. पीकविमा कंपन्यांनी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची नुकसानभरपाई न दिल्यामुळे फजिती झाली आहे. विमा कंपन्यांची ईडीमार्फत चौकशी व्हावी अशी मागणी आंदोलकांनी केली. याप्रसंगी शेतकऱ्यांना तंत्रज्ञान व बाजारपेठेचे स्वतंत्र द्या, कृषिपंपाच्या विजेचे दर कमी करा, जीएम बियाणे वापरण्यासाठी शेतकऱ्यांना परवानगी द्यावी, शेतकरी अपघात विमा योजनेतील जाचक अटी वगळाव्यात, शेतकरी कुटुंब व शेतमजूर यांनाही या योजनेचा लाभ द्या, अशा अकरा मागण्या केल्या. या मागण्या सरकारने त्वरित मान्य कराव्यात अन्यथा शेतकऱ्यांच्यावतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सुनील वडस्कर यांनी दिला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Complete all the debt relief of the farmers