रुग्णाच्या विविध आजारांच्या 92 शस्त्रक्रिया पूर्ण

file photo
file photo

गडचिरोली : धानोरा तालुक्‍यातील सर्च(शोधग्राम) येथील मॉं दंतेश्‍वरी धर्मादाय दवाखान्यात नुकतेच शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. या शिबिरात गर्भाशयासंबंधी विकार, हर्निया, मुतखडा, गलगंड, मूळव्याध, भगंदर यासह इतरही विकारांच्या तब्बल 92 शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
गडचिरोलीसह भंडारा, चंद्रपूर, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील रुग्णांवर या शिबिरात उपचार झाले. 16 वैद्यकीय तज्ज्ञांची चमू यावेळी उपस्थित होती. ग्रामीण भागातील लोक बरेचदा दुखणे अंगावर काढतात. त्यामुळे सहज बरे होणारे आजार अनेकदा शस्त्रक्रियेपर्यंत येऊन पोहोचतात. सर्चमध्ये आलेल्या रुग्णांवर उपचार करताना ही बाब प्रकर्षाने लक्षात आल्याने, अशा रुग्णांवर उपचार करण्यासाठी सर्चद्वारे 2005 पासून दरवर्षी शस्त्रक्रीया शिबिराचे आयोजन केले जाते. मागील चार ते पाच महिन्यांत मॉं दंतेश्‍वरी दवाखान्यात उपचारासाठी आलेल्या रुग्णांपैकी शस्त्रक्रियेची गरज असलेल्यांसाठी नुकतेच शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. यावेळी तब्बल 92 रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. कोल्हापूर, सांगली, सातारा, लोणंद, जळगाव, अकोला येथील 16 डॉक्‍टरांच्या चमूने शस्त्रक्रिया केल्या. यवतमाळ आणि नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थीही शिबिरात मदतीसाठी सहभागी झाले होते. रुग्णालयाच्या संचालक डॉ. राणी बंग यांच्या मार्गदर्शनात शिबिर घेण्यात आले. डॉ. रवींद्र वोरा यांच्या मार्गदर्शनात डॉ. संजय शिवदे, डॉ. महेश प्रभू, डॉ. नमिता प्रभू, डॉ. संपत वाघमारे, डॉ. गुर्जर, डॉ. किशोर वनखेडे, डॉ. सुदर्शन नवाल, डॉ. शिंत्रे, डॉ. सलील बरसोडे आणि डॉ. तरुण गुप्ता यांनी या शस्त्रक्रिया केल्या. डॉ. राजा पाटील, डॉ. शरयू बेलापुरे, डॉ. नीलेश कोरडे आणि डॉ. अनिल साळोक यांनी भूलतज्ज्ञ म्हणून भूमिका सांभाळली.
अनेक त्रास झाले दूर
या शिबिरात प्रामुख्याने महिलांच्या गर्भाशयातील गाठी, गर्भाशयातील रक्तस्त्राव, गर्भाशय बाहेर येणे, यासह मुतखडा, गलगंड, हर्निया, मूळव्याध, भगंदर, फिशर आणि इतरही आजाराच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या.  सोबतच जळालेल्या बोटांवर प्लॅस्टिक सर्जरीही या शिबिरात झाली. त्यामुळे अनेक प्रकारचे त्रास दूर झाले.
------------------------------------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com