पोलिसांविरोधात एकवटले आदिवासी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जानेवारी 2017

गडचिरोली - मंजूर व प्रस्तावित खाणींना विरोध करणारे ग्रामसभांचे सभासद व नागरिकांवर पोलिस दडपशाही करीत अाहेत. त्यांना नाहक वेठीस धरण्यात येत असल्याची तक्रार आदिवासी विकास महामंडळाचे माजी संचालक सैनू गोटा यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

गडचिरोली - मंजूर व प्रस्तावित खाणींना विरोध करणारे ग्रामसभांचे सभासद व नागरिकांवर पोलिस दडपशाही करीत अाहेत. त्यांना नाहक वेठीस धरण्यात येत असल्याची तक्रार आदिवासी विकास महामंडळाचे माजी संचालक सैनू गोटा यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

बांडे, सुरजागड, दमकोंडावाही, मोहंदी-गुंडजूर, आगरी-मसेली आदी ठिकाणी मंजूर व प्रस्तावित लोहखाणींना ग्रामसभा व स्थानिक जनता विरोध करीत आहे. परंतु, हा विरोध दडपून टाकण्यासाठी सुरजागड परिसरातील ७० ग्रामसभा व त्यांना समर्थन देणाऱ्या नागरिकांना गावातून उचलून नेणे, नोटीस बजावणे, मारहाण करणे असे प्रकार सुरू  आहेत. मागील पंधरा दिवसांत एटापल्ली तालुक्‍यातील कटिया बुक्‍लू कवडो (रामनटोला), दानू हिचामी (रेखनार), मंगेश देवू नरोटी, मुरा बिया नरोटे (बेसेवाडा), सुनील (मल्लमपाडी), बाली मालू पुंगाटी (गुंडजूर), लालू केहका गुडरम (बांडे), पांडू नरोटी, लुला पागू नरोटी, रमेश तिबा होळी, चक्कू मुरा होळी (झारेवाडा), बिरजू किसना नरोटी, उमेश देसा लेखामी (गिलनगुडा),  वासू विजा उईके व पदा (नैतला) यांच्यासह अनेक जणांना मारहाण करून त्यांच्यावर विविध  गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

२० जानेवारी रोजी जोनावारा (छत्तीसगड) येथील दोन मुलींना रात्रभर जंगलात ठेवून त्यांचे शारीरिक शोषण केले, असा आरोप पीडित मुलींनी गट्टा परिसरातील महिलांकडे केल्यानंतर या नागरिकांनी या प्रकरणाबाबत आवाज उठविला. परंतु, ग्रामसभांसाठी काम करणारे व खाणींना  विरोध करणारे प्रमुख कार्यकर्ते सैनू गोटा, रामदास जराते व अन्य कार्यकर्त्यांवर पोलिसांच्या बदनामीबद्दल कडक कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला, असा आरोपही सैनू गोटा यांनी निवेदनात केला आहे.

Web Title: Concentrated tribal against the police oppose