वेलतूर परिसरात रंगतेय फुलपाखरांची मैफल

 वेलतूर ः ओस पडलेल्या वस्तीत झाडाफांद्यावर बागळणारी फुलपाखरे.
वेलतूर ः ओस पडलेल्या वस्तीत झाडाफांद्यावर बागळणारी फुलपाखरे.

वेलतूर (जि.नागपूर) : आंभोरा उपसा सिंचन योजनेच्या वेलतूर वसाहतीत वाढलेल्या वनराईत फुलपाखंरानी सदया वस्ती केली असून त्यांचे रंगीबेरंगी थवे निसर्गप्रेमी व अभ्यासकांना चांगलेच आकृष्ट करीत आहेत. वाढत्या प्रदूषणामुळे अनेक जिवजंतू नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यात फुलपाखराच्या काही जातीचा समावेश आहे. मात्र त्या फुलपाखरांची वेलतूर वसाहतीमधील बहरत असलेली मुक्तमैफील निसर्गप्रेमी व अभ्यासकांसाठी आशेचा किरण ठरत आहे.
पर्यावरणाचा ढासळलेला समतोल आणि निसर्गचक्राच्या बदलांमुळे फुलपाखराच्या सुमारे 350 जाती आजपर्यंत भारतातून नामशेष झाल्या आहेत. त्यात एकट्‌या महाराष्ट्रातील 65 जातींचा समावेश असल्याने जैवविवीधतेला मोठा हादरा बसण्याची भिती अभ्यासक व्यक्त करीत आहेत. फुलपाखरू हा परागसिचंनाचा निसर्गातला महत्वाचा घटक आहे. आज तोही नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याने निसर्गातील एक महत्वाची परिसंस्था अडचणीत आल्याचे आता हळूूहळू स्पष्ट होत आहे.सध्या विदर्भासह पश्‍चिम महाराष्ट्रापर्यंत त्याचे नजरेत भरणारे असे अस्तित्व आहे. आकर्षक रंगाचे पंख असलेला व सर्वत्र आढळून येणारा किटकवर्गीय जिव म्हणजे फुलपाखरू होय. त्याच्या नानाविध व आकर्षक रंगसंगतीची जादू लहानसहान पोरांसोरांपासून अबालवृद्धांवरही नेहमीच चालतो. निरुपद्रवी जिव म्हणूनही त्याला निसर्गसाखळीत मान आहे. मित्र किटक म्हणूनही त्यांच्याकडे फार पुर्वीपासून पाहीले जाते. त्याला डोके, पोट आणि छाती हे त्यांचे शरीराचे मुख्य अवयव आहेत. मिशांनी तो वास घेतो तर पायानी चव घेतो. अंडी ,अळी, कोष व किटक या फुलपाखरांच्या वाढीच्या मुख्य चार अवस्था आहेत.विशिष्ठ जातीचे फुलपाखरू विशिष्ट जातीच्याच झाडांवर अंडी घालतात. प्रत्येक जातीच्या फुलपाखराचे अंडी घालण्याचे झाड निश्‍चित आहे. त्याला शास्त्रीय भाषेत "होस्ट प्लांट' असे म्हणतात. फुलपाखराची मादी ही मिलनानंतर लगेच तिला हवे असलेले झाड शोधते व त्यावर अंडी घालते. काही फुलपाखरे एकावेळी एकच अंडी घालतात तर काही समुहाने. ही अंडी पानाच्या मागे किंवा पानाच्या बुचकळ्यात अशी घाललेली असतात. त्यांचा आकार खुप लहान मोहरीच्या दाण्यायेवढा असतो. या फुलावरून त्या फुलावर उडून पराग कण वा मधूकण गोळा करणारा फुलपाखरू ही काहीठीकानी अस्तित्वाची लढाई लढत आहे. त्याला टिकविण्यासाठी जोरकसपणे प्रयत्न करण्यासाठी गरज आहे.
225 जाती शिल्लक
महाराष्ट्रात आजही 225 फुलपाखराच्या जाती शिल्लक आहेत. भारतील एकूण फुलपाखराच्या संख्येपैकी 15टक्‍के फुलपाखरे एकट्‌या महाराष्ट्रात आहेत, हे विशेष. त्याचप्रमाणे "ब्लू मारमान' या प्रजातिचे फुलपाखरू "राज्य फुलपाखरू' म्हणून घोषीत करणारे महाराष्ट्र हे भारतातील एकमेव राज्य होय. 22 जुन 2015 ला महाराष्ट्र राज्य वन्यजिव मंडळाने ही घोषणा केली होती.
फुलपाखरांमुळे निसर्गाची समृद्धी टिकून आहे."होस्ट प्लांट'ं टिकविण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी लढा उभारण्याची गरज आहे.
प्रा.तुलसीदास चाचेरकर, निसर्गप्रेमी
अंदाधुंद किटकनाशक फवारणीमुळे प्रामुख्याने फुलपाखरांच्या जिवनचक्रात फरक पडला आहे. त्याच्या वापराविरूध्द शासनस्तरातून अंकुश घालणे आवश्‍यक आहे.
रंजीत कुकसे
आंभोरा फाऊंडेशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com